हिमायतनगर प्रतिनिधी/ प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाच किरण दाखवणारी रामकथा आहे. रामकथा तुमच्या माझ्या जीवनातील दुख मिटवणारी रामकथा आहे. माणसाला माणूस बनवणारी कथा म्हणजे रामकथा असुन मर्यादाच परिपालन कस करायचे ते रामकथा शिकवते म्हणून प्रत्येकानी सुरू असलेल्या राम चरित्र मानस कथा श्रवण केली तर जिवनाला कलाटणी मिळाल्याशिवाय राहणार असे प. पू. बालयोगी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांनी केले आहे.
हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिरात दोन दिवसापासून संगीतमय रामकथा सोहळा सुरूवात झाली आहे. संगीतमय रामकथा ह. भ. प. बालयोगी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून सुरू आहे. या कथे प्रसंगी भाविकांशी बोलताना गजेंद्र महाराज म्हणाले की रामचरित्र माणस कथा हि माणसाला माणूस बनवणारी कथा आहे. एक महिना भारतवाज मुनींनी गायलेली कथा रूषी, मुनी ,प्ररोज,किनर,नर्सरी देव साधू संतानी ऐकली आहे.
आपल्याच भुमित आपल्याच आराध्याला त्याच्या हक्काची जागा मिळावी ह्यासाठी पाचशे वर्षापासून असंख्य भक्तांनी अनेक संघर्ष करत बलीदाने दिली प्रभु रामचंद्र त्यांच्या जन्मस्थानावर विराजमान होताना बघण्याच भाग्य 22 जानेवारी ला आपलाला लाभणार आहे. त्या पर्वावर परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने आयोजित भव्य रामकथा सोहळा होतो आहे.
रामकथा दरवर्षी ऐकण्यासाठी मिळेल परंतु यावर्षी चा योग्य हा पुन्हा येणारा नाही म्हणून प्रत्येक भक्तांनी हि कथा श्रवण करावी असंख्य ज्ञात अज्ञात राम भक्तांच्या प्रभू रामचंद्रावर असलेल्या अस्थेचे प्रतिक असलेले हे राम मंदिर आपल्याला रामायणातील प्रत्येक व्यक्तीमत्वाची आठवण करून देत राहणार आहे. हा सोहळा आनंदाने भक्तीभावाने साजरा करू ज्यांच्या पवित्र स्पर्शात निर्जीव वस्तुचेही रुपांतर होण्याचे दिव्यत्व होते अशा रामनामाचे संकीर्तन करून आपल्या मनात राम जागवू या असे विस्तृत रामकथा सोहळ्यात भाविकांना गजेंद्र चैतन्य महाराज यांनी केले या रामकथा सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक महिला पुरुषांची गर्दी केली आहे. या संगीतमय सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.
सोपान बोंपीलवार हिमायतनगर
