दिवस असो की राञ पाऊस असो समोर कितीही अडचणी असल्यातरी त्या बाजूला ठेवून कार्यकर्त्यांच्या हाकेला प्रतिसाद देणारा नेताच राजकारणात यशस्वी होतो . ज्यांची नाळ सामान्यांशी जुळली आहे. तो त्यांचे दुख जानतो तोच राजकारणाच्या अन समाजकारणाच्या यशाच्या पायर्या चढत जातो. हिमायतनगर तालुक्यात असच एक उमर्द नेतृत्व गत काही वर्षापासून उभा राहतेय .आपल्या प्रारंभीच्या राजकीय आणि सामाजिक कार्यातील त्यांची तडफ पाहता त्यांना दुसर्यांदा विधानसभेची संधी मतदारांनी दिली.
हा युवा नेता नेतृत्व गुण , संघटन कौशल्य , प्रश्न सोडविण्याची हातोटी जन्मजात घेऊन आलाय असच वाटत..
बालपणापासून सोज्वळ स्वभाव असणाऱ्या माधवराव पाटलांचा जन्म 26 जानेवारी 1972 रोजी तालुक्यातील जवळगाव हिमायतनगर या छोटय़ाशा गावात जन्म झाला. त्यांचे वडील निस्वार्थी माजी आ. कै . निवृतीराव पाटील तर आई जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पाटील या दाम्पत्याच्या माणुसकीच्या संस्कारांतुन माधवराव पाटलांचे व्यक्तीमत्व घडत गेले. उच्च पदवीधर असलेले माधवराव आज मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. वडील निवृतीराव यांची पुण्याई व आशिर्वाद वडील बंधु पंजाबराव पाटील यांची प्रेरणा उराशी घेऊन त्यानी आपली वाटचाल सुरू केली .
अल्पावधीतच ते संपूर्ण मतदारसंघात कमालीचे लोकनेते झाले वडील ऐकेकाळी आमदार आसताना त्यानी मतदारसंघातील निस्वार्थ पणे केलेली जनसेवा आज माधवरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे माधवराव यांचा मातब्बर लोकांनी विरोध केला परंतु हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील गोरगरीब जनतेने आपला खरा नेता कोण हे ओळखून विरोधकांना बाजूला सारून माधवराव पाटलांचा झंझावात जोमाने सुरू झाला. वडील बंधु पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्यावर काळाने घाला घातला तेव्हा माधवरावासह वडीलांना मोठा धक्काच बसला. परंतु इथेच न थांबता प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी निवृत्ती पाटील यांच्याशी बोलून पंजाबरावानतंर तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी माधवरावांना माझ्यासोबत देण्याचे सांगितले. तेव्हा निवृती पाटील यांना आपला छोटा मुलगा माधवराव यांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सोबत पक्षाचे काम करण्यासाठी जाण्याचे फर्मान दिले.
तेथूनच माधवराव यांनी पक्षाचे निस्वार्थ पणे काम करीत असताना लोकांचे प्रेम वाढू लागले . युवकांची फौज त्यांच्या पाठीशी उभी राहिली सर्वञ त्यांचे चाहते व हितचिंतक तयार झाले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्याना काँग्रेस पक्षाचे अधिकृत तिकीट मिळाले त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मताधिक्याने विजय झाला. पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात कोटय़वधी रूपयांची विकास कामाची गंगा खेचून आणली. परंतु आक्टोबंर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता.
परंतु जवळगावकर पराभवाने खचले नाहीत. तालुक्यातील जनतेचा संपर्क ठेवत पुन्ह जनतेच्या अडीअडचणी सोडवत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कामे चालू ठेवली परंतु जनतेची सेवा करीत असताना जवळगावकर यांना ह्रदविकाराचा झटका आला होता. याची बातमी वार्यासारखी पसरली तालुक्यातील कार्यकर्ते घाबरून गेले होते. जवळगावकराना नांदेड वरून डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबई येथे बायपास झाल्यानंतर तब्येतीची सुधारणा झाली असता मुंबईच्या हॉस्पीटल मध्ये आपल्या नेत्याला पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी रांग लागली होती.
जवळगावकर दुखातुन सावरून शहरात येताच उपस्थितांना बोलताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले. या प्रसंगी माधवराव म्हणाले की मला पुनर्जन्म मिळाला असून यापुढील माझे जिवन हे जनतेच्या सेवेसाठी वाहणार असल्याचे म्हणाले .
अशा नशिबवान नेत्याच्या इश्वरांचाही आशिर्वाद पाठिशी असुन या मतदार संघातील जनतेनी पुन्हा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून दिले.
जवळगावकरांनी तालुक्यातील जनतेची मने जिंकली असुन त्याना चांगले यशही मिळत आहे. यातच कामारी जिल्हा परिषद गटातून मातोश्री शांताबाई पाटील जवळगावकर यांचा प्रचंड मतांनी विजय झाला. अन थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांची वर्णी लागली होती.
जिल्ह्य़ातील जनसामान्यांची कामे आज होत आहेत. त्याबरोबरच तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, हिमायतनगर नगरपंचायत ,काँग्रेसची एकहाती सत्ता दिली पुन्हा मतदार बांधवांनी जवळगावकर यांच्यावर दाखवलेला विश्वास विकासाच्या माध्यमातून जवळगावकरांनी सार्थ केला. राजकारणा बरोबर जन सेवा करतांना दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीत सतत मतदार संघात कोरोना महामारीच्या काळात प्रशासन आणि आरोग्य विभागाला सोबत घेऊन ग्रामीण भागासह शहरातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली. यामध्ये जवळगावकर स्वत कोरोना पाॅजिटीव्ह निघाले त्यांच्यावर मुंबईत उपचार झाले मतदार संघातील जनतेच्या आशिर्वादाने कोरोना आजारातून सुखरूप घरी परतले तरी देखील आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना महामारीशी लढा सुरू ठेवत आजही त्याच जिद्दीने काम करीत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 18 पैकी 18 जागेवर कांग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून एकहाती सत्ता आ. जवळगावकर यांच्या
ताब्यात दिली कृषी उत्पन्न बाजार समिती एकहाती जिंकली असल्याने विरोधकांत धास्ती वाढली आहे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपंचायत निवडणुकीत आ. जवळगावकर यांना यश मिळणार हे निश्चित आहे. जनतेच्या जिवाची काळजी घेणारे जवळगावकर हेच खरे जण नेते आहेत.
राजकीय व सामाजिक वाटचालीत सर्वसामान्यांचा पाठिंबा हीच त्यांच्या विकास कामाची पावती आहे. असा प्रेमळ स्वभाव असलेल्या लोकनेत्यास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा....--
सोपान बोंपिलवार
तालुका प्रतिनिधी
हिमायतनगर
