डोंगरदऱ्यातील नागरीकांच्या गावापर्यंत डांबरीकरण रस्ता करून देण्याचे स्वप्न पूर्ण - आ. जवळगावकर - सरसम ते दरेसरसम रस्त्याच्या कामाचे उदघाटन

हिमायतनगर प्रतिनिधी(ज्ञानेश्वर गोडसेलवार)
/ हिमायतनगर तालुक्यातील सेवटच्या टोकापर्यंतच्या नागरीकांना गावाकडे जाण्यासाठी पक्के रस्ते नव्हते नागरीकांना डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते ते आज पुर्ण होत असल्याचा मनाला आनंद असुन निवडणुकीत दिलेल्या अश्वासनाला वचनबद्ध राहून जनतेच्या विकासाची कामे पूर्ण होते आहे असे आ. जवळगावकर म्हणाले. 
हिमायतनगर तालुक्यातील डोंगरदऱ्यातील भागात राहणाऱ्या दरेसरसम ,वाशी, पवना या गावांना जोडणाऱ्या सरसम ते दरेसरसम मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे या कामाचे भूमिपूजन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले आहे. या भागातील नागरीकांनी आ. जवळगावकर यांचा सत्कार केला आहे. व्यासपीठावरून बोलतांना आ. जवळगावकर म्हणाले की हिमायतनगर तालुक्यातील सेवटच्या टोकापर्यंतच्या गावांना डांबरीकरण, मजबूत रस्ते करून देण्याचे स्वप्न होते. या भागातील नागरीकांना कामे करून देण्याचे आश्वासन देखील दिलेले आज पुर्ण केले आहे. अश्ववासने देऊन नारळ फोडणे आपले काम नाही पहिल्यांदा काम नंतर नारळ हि भुमिका ठेवून विकास कामे केली आहेत. तालुक्यातील उर्वरित भागातील रस्त्याच्या कामे देखील लवकरच मार्गी लागणार असल्याचे आ. जवळगावकर म्हणाले यावेळी कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, सभापती जनार्दन ताडेवाड,संचालक शेख रफिकभाई, अ. आखील,ज्ञानेश्वर शिंदे,डॉ प्रकाश वानखेडे, गणेश शिंदे,शिवाजी पाटील , संजय माने, गणेश शिंदे , दिलिप राठोड, सुभाष बलपेलवाड ,बाळाजी पुठेवाड, संजय सुर्यवशी, गंगाराम डोळे, दादाराव भिसे,शेषेराव हुडदुके, धम्मा वाढवे,संतोष अंबेकर,अब्दुल बाकी, राजु चिकनेपवाड , सुनील वानखेडे, कपिल कांबळे साईनाथ शिंदे ,मोकावर, उत्तम उपलवाड, गणेश पाटील, रामंचंद्र पाटील, यांच्यासह या भागातील सरपंच उपसरपंच चेअरमन ग्रामस्थांची उपस्थिती होती. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.