हिमायतनगर प्रतिनिधी/ शेतकऱ्यांच्या कामांना प्रथम प्राधान्य देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे शेतकऱ्यांच्या कामात कोणत्याही अधिकाऱ्यांनी कुचराई केल्यास परिणाम भोगावे लागतील त्यामुळे शेतकऱ्यांच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे बोरगडी सज्जाला तलाठी नसल्यामुळे सातशे शेतकरी अतिवृष्टी च्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान तात्काळ जमा करण्याच्या सूचना आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केल्या आहेत.तलाठी नसल्याने कामे खोळंबली यावरून आ. जवळगावकरांनी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्याना धारेवर धरले शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असा दमही दिला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी सज्जाला तलाठी मिळत नसल्यामुळे आ. माधवराव पाटील जवळगावकरांची भेट घेतली. सातशे शेतकरी अतिवृष्टी च्या अनुदानापासून वंचित कसे राहिले असेही जवळगावकर म्हणाले जे शेतकरी वंचित आहेत त्यांचे तात्काळ कामे करून अनुदान खात्यात जमा करा अशा सुचना आ. जवळगावकरांनी केल्या आहेत.
याबरोबरच बोरगडी सज्जाला तलाठी पि. एस. बड्डेवाड यांना चार्ज तात्काळ देऊन सदरील कामे पूर्ण झाले पाहिजे याकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. बोरगडी सज्जाला तलाठी मिळत नसल्याचे वृत दैनिक पुण्यनगरी ने प्रकाशित केले त्याची दखल घेत सदरील सज्जाला तातडीने तलाठी देण्याच्या सूचना आ. जवळगावकरांनी केल्या या सज्जाला तलाठी देण्यासाठी आडकाठी आणणाऱ्या तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांची खरडपट्टी जवळगावकरांनी काढल्याचे वृत आहे.
शेतकऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण होता कामा नये कोणत्याही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कामाना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे असेही जवळगावकर म्हणाले सोमवार पर्यंत बोरगडी सज्जाला तलाठी देऊन वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी चे अनुदान जमा झाले पाहिजे अशाही सुचना केल्या आहेत.
