हिमायतनगर प्रतिनिधी/ मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले हि भुमिका ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून दिवसेंदिवस समाज बांधवांची भुमिका अधिक तीव्र होत असतांना समाजाच्या मागणीसाठी पक्ष दखल घेत नसेल तर आम्ही समाजासोबत राहणार असल्याची भावना ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे सुनिल पाटील पतंगे यांनी सांगितले आहे.
हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी हिमायतनगर तालुक्यातील पहिले तालुकाध्यक्ष आहेत समाजासाठी पक्षाचा राजीनामा दिला आहे .
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे काम केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपण संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून अनेक वेळा मागणी केली होती. परंतु आज सर्व मराठा समाज एकवटला असल्याने समाजाची मागणी पक्षश्रेष्टी लावून धरीत नाही त्यामुळे आपण पक्षाचा राजीनामा देऊन समाजाला पाठिंबा दिला आहे. हिमायतनगर तालुक्यातील सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून राजकीय नेत्यांना गाव बंदी करून आरक्षणासाठी लढत आहेत.
