नांदेड किनवट राज्य रस्त्यावर कारला येथील मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन - एक मराठा लाख मराठा घोषणा देत आंदोलन

हिमायतनगर प्रतिनिधी/ मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करून आरक्षण द्यावे. या मागणीसाठी मराठा समाज आता रस्त्यावर उतरला आहे. मंगळवारी कारला येथील सकल मराठा समाज बांधवानी नांदेड किनवट  राज्य रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले असून एक मराठा लाख मराठा घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले.  हिमायतनगर तालुक्यातील कारला पी. गावातील सकल मराठा समाजा बांधवांच्या वतीने मंगळवारी आरक्षणासाठी नांदेड किनवट राज्य रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आणि राज्य सरकारचा निषेध केला. गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांना गाव बंदी करून फलक लावण्यात आला आहे. 
या आंदोलना दरम्यान पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनूर जमादार सुरकूंडे यांनी गावातील सकल मराठा समाजाच्या मागण्याचे निवेदन स्विकारले आहे. या आंदोलना दरम्यान राज्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक थांबली होती. मराठा समाजाची मागणी तात्काळ सरकारने लक्षात घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी सरपंच गजानन पाटील कदम यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.