हिमायतनगर प्रतिनिधी/ मराठा समाजाचे योध्दा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देत माझ्या गावातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी कौठा येथील सरपंच गौतम दवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या बौद्ध सरपंचाच्या निर्णायाचे अभिनंदन कौतुक केले असून या निर्णयामुळे मराठा समाजातील सरपंच उपसरपंच बांधवांसमोर मोठे आव्हान आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कौठा ज ग्रामपंचायत सरपंच गौतम दवणे यांनी गेल्या तिन वर्षापासून आपल्या गावातील नागरीकांना सोबत घेऊन गावातील विकास कामे मार्गी लावले आहेत. माझ्या गावातील मराठा समाजातील तरूण विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आरक्षण पासून वंचित आहे. त्यासाठी मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू केला आहे. त्यांना पाठिंबा म्हणून सरपंच गौतम दवणे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा गुरूवारी तहसीलदार डि. एन. गायकवाड, गटविकास अधिकारी सुधिश माजंरमकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. बौद्ध समाजातील सरपंच गौतम दवणे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या या निर्णयाचे सकल मराठा समाजाकडून कौतुक व सत्कार केला आहे.मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ तालुक्यातील पहिलेच सरपंच आहेत. एका बौद्ध समाजातील सरपंचाने राजीनामा दिल्यानंतर मराठा समाजातील सरपंच विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
