हिमायतनगर प्रतिनिधी/ आजच्या युगातील माणूस अनेक ढोंग करून जगतो जन्म देणाऱ्या माता पित्यांना आश्रमाची वाट दाखवतो आणि एकीकडे देव देव करत फिरतो अशा माणसाला ओळखले पाहिजे प्रत्येक मुलांनी आपल्या जन्मदात्यांची आयुष्यभर सेवा करावी तेंव्हाच पुण्यकर्म पदराला आल्याशिवाय राहणार नाही असे ह. भ. प. बालयोगी शामसुंदर महाराज आष्टीकर यांनी किर्तन सेवेत केले आहे.
कारला येथील सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या वतीने ह. भ. प. बालयोगी शामसुंदर महाराज आष्टीकर यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तन सेवेत प्रथम सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला या चरणावर आष्टीकर महाराजांनी किर्तन केले. पुढे बोलतांना महाराज म्हणाले हिंदू धर्मातील युवक एकत्रित होणारे सार्वजनिक उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करीत आहेत.परंतु हे उत्सव साजरे करणारे युवक भविष्यात व्यसनाधीनतेच्या आहारी जातील याची काळजी समाजाने घेतली पाहिजे, रामाने वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले. परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुष झाले.
त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले. आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यानी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्यास सांगितले. परशुरामाची विचार शक्ती ऋषीना आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पुर्ण केली अशी भक्ती केली पाहिजे असे म्हणाले या किर्तनान टाळ, मृदंग वादक लक्ष्मण मंदेवाड महाराज, प्रभाकर बाचकलवाड, भगवान गुंफलवाड,मारोती राहुलवाड, नाथा चव्हाण, दत्ता चिंतलवाड बालाजी मोरे, प्रा. मारोती देवकर,रमेश कदम, केशव रासमवाड,रामदास बोंपीलवार, रामराव लुम्दे,लक्ष्मण चिंतलवाड, परमेश्वर पाटील,अशोक चपलवाड,गजानन मिराशे, रामराव पाटील, वसंत मिराशे, आत्माराम मोरे, आनंद सुर्यवंशी,गणेश मुठेवाड,ओमकार गोणेवाड, अमोल सुरोशे यांच्यासह महिला मंडळ भाविकांची उपस्थिती होती.
