हिमायतनगर प्रतिनिधी/ एकंबा येथील कानिफनाथ देवस्थान मंदिराच्या सभागृहासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे भूमिपूजन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील एकंबा येथील कानिफनाथ मंदिर देवस्थान विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भक्त मंडळी व गावकऱ्यांनी केली होती. गावकऱ्यांच्या मागणीची दखल घेत आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी या देवस्थान मंदिर सभागृहाच्या बांधकामासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदरील निधी मंजूर होताच रविवारी कानिफनाथ मंदिर देवस्थान सभागृहाचे भूमिपूजन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जवळगावकर यांचा सरपंच उपसरपंच ग्रामस्थांनी सत्कार केला. गावातील सि. सि. रस्त्यासाठी निधी मंजूर केला असून त्या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपस्थित गावकऱ्यांना बोलतांना आ. जवळगावकर म्हणाले की एकंबा गावासह परिसरातील मंदिर देवस्थान च्या विकासासाठी आजपर्यंत निधी दिला आणि तेथील सभागृहाचे काम देखील पुर्ण केले आहे. गावातील उर्वरित रस्ते आणि इतर विकासासाठी आणखी निधी उपलब्ध करून देणार असून येथील नागरीकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही होईल तेवढा निधी देऊन गावात विकासाची कामे करून देऊ असे आश्वासन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यक्त केले. यावेळी कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, सभापती जनार्दन ताडेवाड, संचालक शेख रफिकभाई,सरपंच अश्विनी कल्याणकर, उपसरपंच दत्ता कोंकेवाड, संजय माने, अ. बाकी,योगेश चिलकावार, सोपान बोंपीलवार, प्रभाकर कल्याणकर,यशवंत वाघमारे, भिमराव कानिंदे, रमेश लुम्दे, बालाजी मेटकर, मारोती पुंजरवाड, सुभाष बोईनवाड, शंकर कदम गंगाधर त्रिमलवार, टिकराम कदम, सय्यद मोदलाल, यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वर गोपतवाड यांनी केले.
