हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेला अचानक जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्यासह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन शालेय परिस्थितीचा आढावा घेतला असता शाळेची सुसज्जता आणि विद्यार्थ्यांना असणारी व्यवस्था पाहून येथील शिक्षकांचे कौतुक केले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन प्रत्येक शाळा परिस्थिती आढावा घेण्यात येत आहे. शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. गाडवे , उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार , पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनूर, व पथकातील संपूर्ण टीमची उपस्थिती होती.
शाळेतील आनंददायी वातावरण, शालेय स्वच्छता, स्वचछतागृह, शालेय रंगरंगोटी, डिजिटल वर्ग खोल्या, शालेय वाचनालय, शालेय पोषण आहार, पिण्याचे RO फिल्टर पाणी,प्राप्त असलेल्या सर्व भौतिक सुविधा सर्व वर्गातील चालू स्थितीतील टी.व्ही. प्रोजेक्टर, पंखे,कुलर,पाण्याची व्यवस्था,शालेय बँड पथक यांची पाहणी केली. शाळेतील प्रत्येक वर्गातील शिस्त आणि चुनचुणीत व बोलके विद्यार्थी,सुंदर व स्वच्छ शालेय परिसर उत्कृष्ट कार्य पाहून जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. गाडवे यांनी शिक्षकांचे कौतुक केले आहे.शाळा परिसरात न्यायाधीश यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.
मुख्याध्यापक संगमनोर , शिक्षक नाथा गंगूलवार, कदम,
शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश पाळजकर,सदस्य किरण माने शिक्षकवृंद उपस्थित होते.
