मनरेगा योजनेसाठी पुढाकार घेतल्यास शेतकऱ्यांसह गाव समृद्ध बनेल- उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड

हिमायतनगर प्रतिनिधी/ महाराष्ट्र रोजगार हमी योजना ग्रामपंचायत माध्यमातून सरपंच ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन राबविल्यास गावाचा विकास साधता येतो याच योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहच करून त्यांना मदत केल्यास शेतकऱ्यासह गाव समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी पंचायत समिती सभागृहाच्या बैठकीत सरपंच ग्रामसेवकांना सुचीत केले. 

      हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सरपंच ग्रामसेवकांच्या बैठकीचे आयोजन नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा अमित राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी अमित राठोड यांचा गटविकास अधिकारी माजंरमकर यांनी सत्कार केला. सरपंच संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. या बैठकीस तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक , रोजगार सेवक उपस्थित होते. बैठकीत बोलतांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा अमित राठोड म्हणाले महाराष्ट्र रोजगार हमी योजनेला सध्यस्थितीत निधी उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ गावोगावी घेऊन योजना राबविण्यात यावी ग्रामसभेचे आयोजन करून आराखडा तयार करावा व सभेतून नागरीकांची निवड करावी ज्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर दिली त्या शेतकऱ्यांच्या विहीर चे मस्टर भरून रोजगार सेवकांनी मदत करावी शेतीत पाणी उपलब्ध असल्यास शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढेल शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. स्यार्ट ग्राम करण्यासाठी सरपंच ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा, स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे प्रत्येक ग्रामसेवकांनी स्वच्छता अभियानात पुढाकार घेतल्यास स्वतला आत्मसमाधान मिळाले पाहिजे म्हणून सरपंच ग्रामसेवकांनी पुढाकार घेण्याच्या सूचना राठोड यांनी केल्या आहेत. यावेळी गटविकास अधिकारी सुधीश मांजरमकर , सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, बाळा पाटील, मारोती वाडेकर, कानबा पोपलवार, सोपान बोंपीलवार, गौतम दवणे, जयस्वाल, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी शिवराज सुर्यवंशी, तांत्रिक अधिकारी लक्ष्मीकांत गाडे, आनंद भिसे, अविनाश सोमवंशी, सिडीओ, मिरा गुड्डेटवार , रवि ढगे, 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.