हिमायतनगर प्रतिनिधी/ “होऊ द्या चर्चा या अभियानातून मोदी सरकारने निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेली आश्वासनं फोल ठरली आहेत. त्याच्या खोट्या आश्वासनांचा जाब विचारण्यासाठी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने होऊ द्या चर्चा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. टिबल इंजिन सरकारने खोटी आश्वासने दाखवून शेतकरी , बेरोजगारांची फसवणूक केली असल्याचा आरोप विधानसभा संपर्कप्रमुख सचिन पाटील चरहाटे यांनी केला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सोनारी, सिरंजनी येथे आयोजित करण्यात आलेल्या “होऊ द्या चर्चा या अभियानाच्या मंचावरून बोलत होते. होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात उपस्थित शेतकरी, युवकांना मार्गदर्शक करतांना सचिन पाटील चरहाटे म्हणाले की
अभियानाच्या माध्यमातून माध्यमातून काळा पैसा भारतात आला का, १५ लाख रुपये बँक खात्यात आले का, सर्वांना पक्की घरे मिळाली का, बेरोजगारांना नोकरी मिळाली का, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाले का, नवीन उद्योगधंदे आले का, महागाई कमी झाली का, घरगुती गॅसवरील सबसिडी बंद का केली, रहस्य सर्व बोलघेवड्या योजनांचा जाब विचारत ‘होऊ द्या चर्चा’ अभियानांतर्गत ठाकरे गटाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करत सरकारच्या खोट्या आश्वासनांचा बुरखा फाडला जात आहे.
सध्याच्या प्रशासकीय राजवटीमुळे नागरिक त्रस्त आहेत. हजारो शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळत नाही, नुकसानीची भरपाई मिळत नाही या सर्व प्रकारचा आक्रोश येणाऱ्या निवडणुकीत मतदान पेटीतून व्यक्त होण्याची जाणीव असल्यामुळेच निवडणुका घेण्यास शासन घाबरत आहे. त्यामुळे आम्हाला केंद्र सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांची नागरिकांना आठवण करून दिली पाहिजे असेही म्हणाले या कार्यक्रमाचा समारोप सिरंजनी येथे झाला यावेळी हदगाव शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील मनुलेकर, उप जिल्हाप्रमूख दिगंबर पाटील वाळकीकर , विधानसभा संघटक अवधूत पाटील देवसरकार,बळीराम देवकते , जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे,युवासेना तालुकाप्रमुख योगेश पाटील , युवासेना तालुका समन्वयक संतोष पुलेवार पोटेकर,,शिवदुत रामभाऊ गुंडेकर, विशाल अललवाड, सुभाष शिलेवाड , गणेशराव राहुलवाड सिरंजनी येथील ग्रामस्थ शिवसैनिक उपस्थित होते.
.
