हिमायतनगर तालुका क्रिडा संकुल तयार व्हावे यासाठी आ. माधवराव पाटील जवळगाकर यांनी पाठपुरावा केला होता. जागे अभावी क्रिडा संकुल चा प्रश्न प्रलंबित राहिला होता त्या क्रिडा संकुलनासाठी पाच कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असुन लवकरच संकुल उभे राहणार आहे. आ. जवळगाकर यांच्या प्रयत्नामुळे क्रिडा संकुलनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील खेळाडूंना क्रिडा संकुलनाची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू होती.परंतु संकुलनासाठी जागा उपलब्ध नसल्याने प्रलंबित होते. आ. माधवराव पाटील जवळगाकर यांनी क्रिडा संकुल आणि आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह इमारतीसाठी घारापुर शिवारातील गायरान जमिनीची पाहणी समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी केली होती. त्याच जागेवर तालुका क्रिडा संकुल होणार आहे. यासाठी आ. माधवराव पाटील जवळगाकर यांनी क्रिडा संकुल चा प्रश्न शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातून तालुका क्रिडा संकुलनासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामास प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. तालुका क्रीडा संकुलन मंजूरी करीता प्रयत्न केले असून पाच कोटी रुपये मंजूर देखील झाले आहे लवकरच घारापुर शिवारातील गायरान जागेत संकुल उभे राहणार असुन क्रिडा स्पर्धा व खेळाडूंचा प्रश्न मार्गी लागला याचा आनंद झाला असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगाकर यांनी पुण्य नगरीशी बोलताना सांगितले आहे.
