कामारी , सरसम येथील मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला आ. जवळगाकरांची भेट

हिमायतनगर प्रतिनिधी/ मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील हदगाव येथील दत्ता पाटील हाडसणीकर यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कामारी,सरसम येथील मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले आहे. त्या दोन्ही उपोषणाला रविवारी आ. माधवराव पाटील जवळगाकर यांनी भेट दिली आहे. 
 
     कामारी आणी सरसम येथील मराठा समाजाच्या वतीने समाजाला आरक्षण मिळाले आणि जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील हदगाव येथील दत्ता पाटील हाडसणीकर यांच्या प्रमुख मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करून पाठिंबा दिला आहे. या साखळी उपोषणात दररोज कामारी,सरसम गावातील मराठा समाज बांधव बसुन आहेत . 

रविवारी आ. माधवराव पाटील जवळगाकर यांनी कामारी आणी सरसम गावात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट देऊन समाजाच्या मागण्या आपण सरकार दरबारी मांडणार आहे. आणि समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हि भुमिका आहे.मी आमदार म्हणून नाही तर समाजाचा प्रतिनिधी आलो आहे. आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी समाजाच्या सोबत असुन आरक्षण मिळाले पाहिजे हि भुमिका आहे असेही आ. जवळगावकर म्हणाले यावेळी सरसम आणि कामारी येथील मराठा समाज बांधव उपस्थित होते. 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.