स्वयंपाक करीत असतांना घरगुती गॅसच्या स्फोटात एकाच कुटुंबांतील पती पत्नीचा मृत्यू / तर तिघे गंभीर अवस्थेत हिमायतनगर पारवा बु. गावातील घटना...

हिमायतनगर प्रतिनिधी(सोपान बोंपीलवार) तालुक्यातील पारवा बु. येथे शनिवारी सायंकाळी स्वयंपाक करीत असतांना घरगुती गॅसचा स्फोट झाला या घटनेत घरातील पाच व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या. सदरील गंभीर जखमींना नांदेड च्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता यातील पती पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. तर यातील आणखी तिघे गंभीर अवस्थेत असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एकाच कुटुंबावर झालेल्या घटनेमुळे पारवा गावावर शोककळा पसरली आहे. 

 पारवा बु. येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी भीमराव माने यांच्या घरी दि. 16 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घरगुती गॅसचा स्फोट होऊन कुटुंबातील पाच व्यक्ती भाजले आहेत. गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तींना गावातील नागरिकांनी तातडीने भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल करून तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचार करण्यासाठी नांदेड येथे पाठविले होते. या घटनेत शेतकरी बालाजी भीमराव माने वय 50 वर्षे कुटुंबप्रमुख, राधाबाई बालाजी माने वय ४५, वर्ष वच्छलाबाई भीमराव माने वय 65 वर्ष मोनिका बालाजी माने वय 19 वर्ष गजानन बालाजी माने वय 27 वर्ष आपल्या घरी असताना सायंकाळच्या भोजनाची तयारी करणारी आई हे गॅसवर स्वयंपाक बनवत होती अचानक घरगुती गॅसचा स्पोर्ट होऊन कुटुंबातील पाच व्यक्ती गंभीरित्या भाजली गेले होते.
 
सदरील गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असताना यातील घरमालक बालाजी भिमराव माने, पत्नी राधाबाई बालाजी माने, यांचा उपचारादरम्यान सकाळी 9 वाजता रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पती पत्नी स्फोटाच्या घटनेत मृत्यू झाला असल्याने पारवा गावावर शोककळा पसरली आहे. 
 तामसा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पारवा बुद्रुकला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी व त्यांचे सहकारी येऊन रात्री घटनास्थळी भेट दिली होती. गॅसचा स्फोट एवढा गंभीर होता की संपूर्ण गावामध्ये एकच हादरा बसला आहे.घटनेच्या रात्री आ. माधवराव पाटील जवळगाकर यांनी भेट देऊन रुग्णालयात पाठवून रुग्णांची माहिती घेतली आहे. घटनेतील मयत पती पत्नीवर रविवारी 5 वाजता पारवा बु गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंत्यविधी साठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता . 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.