हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील राष्ट्रसाधना इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा बसविण्यात आला आहे.गणपती बाप्पा आरती दररोज करून जल्लोष करीत आहेत. हिमायतनगर येथील राष्ट्रसाधना इंग्लिश स्कूल मध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा बसविला आहे.
या गणपती बाप्पा च्या आरती करीता पालकांना आमंत्रित करण्यात येत आहे.गणपती बाप्पा करीता भव्य असे डेकोरेशन करण्यात आले आहे. दररोज आरती करण्यासाठी पालकांची उपस्थित रहात आहे. शाळेचे संचालक मंडळ आणि शिक्षकांनी देखील सहभागी घेतला आहे. या गणपती बाप्पा दर्शनासाठी पोलीस उपनिरीक्षक नंदलाल चौधरी, नितेश जैस्वाल, रामेश्वर पाकलवाड, सौ. सिमा जैस्वाल, मुख्याध्यापक अर्जुन सोमागारी, उपमुख्याध्यापक कैलास जाधव, अविनाश बोंपीलवार, वंदना पंडित, सिद्धी हिंगमिरे, रेवती सोमागारी, मोहिनी चंदनवार, पुष्पा राठोड, बजरंग गुडेटवार, सविता माने, प्रशांत सूर्यवंशी,अजय जाधव, भाग्यश्री शिंदे, स्वाती अस्तुरे, प्राची जाधव, इत्यादी शिक्षक उपस्थित होते.
