हिमायतनगर प्रतिनिधी/ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून घेण्यात आलेल्या पीएम स्कील रन स्पर्धेच्या रनिंग मध्ये संदीप यटलेवाड तर द्वितीय आरती राऊत यांनी क्रमांक पटकावला आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था द्वारे सकाळी 7 ते 8 या वेळेत पीएम स्कील रन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. युवा वर्गामध्ये कौशल्य विकास बाबत जनजागृती व्हावी हा या मागचा उद्देश असुन यामध्ये सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
या पीएम स्कील रन स्पर्धेत रनिंग मध्ये पुरूष गटातून अनेक युवकांनी सहभाग घेतला होता परंतु या स्पर्धेत कारला येथील संदीप दत्ता यटलेवाड या युवकांने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर महिला गटातून आरती राऊत हिने रनिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाची रक्कम वाटप करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील युवकांनी क्रिडा स्पर्धेची तयारी करून स्पर्धेत विजय मिळवला पाहिजे असे आ. माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले या स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन सुभाष राठोड,परमेश्वर गोपतवाड,जनार्दन ताडेवाड,संजय माने,प्रा.सुनिल ननवरे,सोपान बोंपीलवार, डॉ. गफार,सरपंच गजानन कदम,सुभाष शिंदे, अ. बाकी,आनंता देवकते,रेड्डी,अशोक डावरे, यांनी कौतुक केले.
