हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला जिल्हा परिषद शालेय समिती अध्यक्षपदी भगवान यमजलवाड उपाध्यक्षपदी तुकाराम कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
कारला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये सर्वानुमते शालेय समिती अध्यक्षपदी भगवान यमजलवाड तर उपाध्यक्षपदी तुकाराम कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सरचिटणिस सरस्वतीबाई गाडेकर, चिटणीस तुकाराम कांबळे, सदस्य रामेश्वर यमजलवाड, प्रा. डि. डि. घोडगे,मुकिंद मिराशे, गजानन कदम, सौ. दुर्गाबाई मोरे, सौ. सविता यमजलवाड, सौ. अर्चना रासमवाड, अनिल घोडगे, भारत कांबळे, सौ. अल्काबाई चौरे,मनिषा नरवाडे,पिंकाबाई वाघमारे,अशी शालेय शिक्षण समिती निवड करण्यात आली आहे.
या बिनविरोध निवड बद्दल अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे अभिनंदन सरपंच गजानन कदम, तंटामुक्ती समिती अध्यक्ष डॉ गफार,ग्रामसेवक नारायण काळे, मुख्याध्यापक जाधव, ग्रा. पं. सदस्य सोपान बोंपीलवार,उत्तम कांबळे, सुनिल घोडगे, सुरेश चपलवाड,शिवाजी एटलेवाड, स्वप्निल हाटकर, जांबुवंत मिराशे,आनंद रासमवाड,अगंद सुरोशे, ग्यानबा इटेवाड, नाथा चोरे,विठ्ठल सुर्यवंशी,संतोष रासमवाड,वैजनाथ यमजलवाड, गजानन चिंतलवाड, संभाजी ढाणके,मधुकर घोडगे,
यांनी समितीचे अभिनंदन केले आहे . शालेय विद्यार्थ्यांसाठी सुविधा करून शाळेचा परिसर स्वच्छ ठेवून विद्यार्थ्यांना कम्प्युटर ज्ञान मिळाले पाहिजे यासाठी समिती पालकांनी लक्ष दिले पाहिजे असे तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार म्हणाले
