हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील जमिनी खरडून पिकांचे नुकसान झाले आहे . प्रत्येक सज्जाच्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांच्या शेतीसह पंचनामे करावे एकाही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन काम करण्याच्या सूचना तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या संदर्भात 31 जुलै रोजी पंचायत समिती सभागृहात आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी तहसीलदार,गटविकास, मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना बोलतांना आ. जवळगावकर म्हणाले की अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करीत असताना त्या गावातील नुकसान झालेला शेतकरी सुटता कामा नये प्रत्येक शेतकऱ्यांच्या नुकसान झालेली परिस्थिती लक्षात घेऊन पंचनामे करावे तलाठ्याने सर्व पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. जवळगावकर म्हणाले या बैठकीस तहसीलदार आदित्य शेंडे, गटविकास अधिकारी बळवंत, नायब तहसीलदार ताडेवाड, विस्तार अधिकारी शिंदे, माजी जि. प. सदस्य सुभाष राठोड, सभापती जनार्दन ताडेवाड, परमेश्वर गोपतवाड, शेख रफिकभाई, अ.आखील , प्रकाश वानखेडे, ज्ञानेश्वर शिंदे,जोगेंद्र नरवाडे,गजानन सुर्यवंशी, संजय माने, प्रल्हाद पाटील,योगेश चिलकावार, श्रीदत्त पाटील,अ.बाकी, राजेश चिकनेपवाड, सुभाष बलपेलवाड,दिलीप राठोड,सरपंच मारोती वाडेकर,गौतम दवणे,संजय सुर्यवंशी, यांच्यासह सरपंच, उपसरपंच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
