सर्वरोगनिदान शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा - बाबुराव कदम कोहळीकर

हिमायतनगर प्रतिनिधी/व्याधीग्रस्त गरजू रुग्णांसाठी सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरात रुग्णांवर मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले आहे, दिनांक ४ शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम येथे सर्व रोगनिदान व उपचार शिबिरा पूर्वी कार्यकर्ते व आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या नियोजन बैठकीत ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.

व्यास्पिठावर माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर, सांगवी (मेघे) हॉस्पिटल वर्धा चे रुग्ण संपर्क अधिकारी एन.पी. शिंगणे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता मुरलीधर उमाटे, वैद्यकीय अधिकारी डांगे,  डॉक्टर नखाते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, अभिनेता विनय देशमुख, महिला आघाडीच्या शितल भांगे पाटिल, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश पाटिल हडसणीकर यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना कोहळीकर म्हणाले ; तालुक्यामध्ये गोरगरीब आदिवासी बहुल भागात रुग्ण आजार अंगावरच काढतात, आर्थिक अडचणीमुळे उपचार घेणे शक्य होत नाही, अशा रुग्णांसाठी दोन महिन्या पूर्वी हदगाव येथे भव्य अशा सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले होते त्या शिबिराला रुग्णांचा आणि नातेवाईकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्याच धर्तीवर दिनांक १३ ऑगष्ट रविवारी हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय परीसरात सर्व रोग निदान उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरामध्ये गरजू रुग्णांनी हजेरी लावून उपचार करून घ्यावेत, शस्त्रक्रिया संबंधी निदान झाल्यास त्याचा सर्व खर्च मोफत केला जाणार आहे, या शिबिराचे आयोजन दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे.

दि. १३ ऑगष्ट रविवारी होवु घातलेल्या शिबीराचे उद्घाटन मृद जलसंधारन मंत्री संजय राठोड यांचे हस्ते होणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन हिंगोली लेकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटिल, शिवसेना उपनेते तथा संपर्क  प्रमुख आनंदराव जाधव, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांचीही उपस्तिथी राहणार आहे.

बैठकीला भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान, जेष्ठ शिवसैनिक बालाजी राठोड, भाजपा युवा मोर्चाचे रामभाऊ सूर्यवंशी, माजी जिल्हा परीषद सदस्य संभाराव लांडगे, बाबुसराव कदम, बेबाताई गव्हाणकर, विजय वळसे पाटील, लक्ष्मणराव जाधव, राजू पाटील पिंपरीकर, राजू पाटील सेलोडेकर, अभिनेता विनय देशमुख, बबनराव कदम, युवा सेनेचे तालुकाप्रमुख बाळा पतंगे, खासदार हेमंत पाटिल यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार, राजेश गोडसेलवार, अनिरुद्ध गोळेगावकर, पत्रकार प्रकाश जैन, दत्ता शिराणे यांची उपस्थिती होती. 

--- चौकट --- 

*एक वेळ गरजु रूग्णाला केलेली मदत तो आयुष्यभर विसरत नाही - डॉ शिंगणे*

कुठल्याही क्षेत्रात कुणाला केलेली मदत केवळ थँक्यु धन्यवाद पर्यंत मर्यादित असते, परंतु गरजु रूग्णांवर उपचार करून आजार बरा केला जातो असे रूग्ण त्यांचे नातेवाईक संबंधिक डॉक्टर, किंवा मदतगार व्यक्तीला आयुष्यभर विसरत नाहीत, एवढी ताकत रूग्ण सेवे मध्ये आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सेविका कर्मचाऱ्यांशी संवाद साधतांना त्यांनी अवघड प्रसृती सरळ केल्याचा सुखद अनुभव सांगुन उपस्थित महिलांना सेवेशी तत्पर राहवे असे प्रेरक विचार दिले, दवाखाण्यात रूग्णाला भेटायला येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांनी खाद्य, फळफळावळ सोबत आनने ठिक आहे, त्या सोबत काही  अंशी रक्तदान कराव असही आवाहन सांगवी (मेघे) हॉस्पिटल वर्धा चे रुग्ण संपर्क अधिकारी एन.पी. शिंगणे यांनी केल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.