हदगाव तालुक्यातील पुरग्रस्तांना धीर देत, पाण्याखाली गेलेल्या १४ घरातील कुटुंबियांचे शासन आणि स्थानिकांच्या मदतीने तात्पूर्ते पूनर्वसन
नांदेड, दि.२२ (प्रतिनिधी) ः गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील हदगाव - हिमायतनगर तालुक्याला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. शेकडो घरात पाणी शिरले असून महामार्गही पाण्याखाली गेला आहे. पैनगंगा, कयाधू नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील दिल्लीत असून, त्यांच्या सुचनेनुसार राजश्री हेमंत पाटील यांनी शनिवारी (दि.२२) हदगावचे तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्यासह नेवरी येथील पुरग्रस्तांना भेटुन संवाद साधत त्यांना धीर दिला.
गुरुवार (दि.२०) रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे, नागरिकांनी घरात जमवून ठेवलेल्या गहू, तांदूळ, दाळ यासह खाद्य वस्तू पाण्याखाली गेल्याने कुटुंबातील लोकांची खूप मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांचे धन असलेले गाई, म्हैशी, बैल, आणि शेळ्या पुरात अडकुन पडल्या आहेत. हदगाव तालुक्यातील नेवरी, मार्लेगाव, पिंपरखेड या परिसरातील भागांची राजश्री हेमंत पाटील यांनी पाहणी करून पुरपरिस्थितीचा आढावा घेतला आणि खासदार हेमंत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन व्हिडीओ कालच्या माध्यमातुन पुरग्रस्त गावकऱ्यांशी संवाद घडवून आणला. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी शासन पूर्णपणे आपल्यासोबत असल्याचा विश्वास गावकऱ्यांना दिला. तेथील १४ घरे पाण्याखाली गेल्याने त्या कुटुंबियांची शासनाच्या वतीने तात्पूरती राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली. त्या ठिकाणी जाऊन राजश्री हेमंत पाटील यांनी तेथील सुविधांची पाहणी केली.
खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड, हिंगोली आणि यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून भ्रणनध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेतला असून, योग्य ते मदत कार्य पोहचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्याकडून हदगाव तालुक्याचा पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन त्यांना तात्काळ मदत व नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याच्या सुचना खासदार हेमंत पाटील यांनी केली असल्याची माहिती देखील राजश्री हेमंत पाटील यांनी माध्यमांना दिली. यावेळी त्यांच्या सोबत सरपंच रंजना भारती, उपसरपंच ज्ञानदेव शिंदे, ग्राम पंचायत सदस्य नारायण शिंदे, श्रीराम पाटील, किशोर खिल्लारे, प्रभाकर परघने. श्रीराम शिंदे, स्वस्त धान्य दुकानदार यादवराव मिराशे यांची उपस्थिती होती.
चौकट - राजश्री हेमंत पाटील यांनी आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यात आडकुन पडलेल्या नागरीकांच्या मदतीस आलेल्या एसडीआरफच्या (गट ६) टिमशी संवाद साधुन नागरीकांबद्दल माहिती घेतली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार नामदेव ससाने, माजी आदार राजेद्र नजरधने, शिवसेनेचे महागावचे तालुका प्रमुख राजु राठोड, नगरपंचायतचे उपनराध्यक्ष सुरेश नरवाडे, भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, चिलगव्हाणचे सरपंच श्री काळे, दत्तराव कदम, उपसरपंच कुणाल राठोड, चयन राठोड, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जगदीश नरवाडे, तहसिलदार अश्विनी नुपडे, जिल्हा उप मुख्यकार्यकारी अधिकारी व्यंकट राठोड, एसडीपीओ श्री काळबांडे.
