हदगाव हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या आ. जवळगावकरांनी घेतली मदत व पुनर्वसन मंत्र्यांची भेट

हिमायतनगर प्रतिनिधी/ (सोपान बोंपीलवार)हदगाव हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिके मातीमोल झालेली आहेत सध्या शेतकरी संकटात असुन शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन केली असून शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता मदत व पुनर्वसन मंत्री यांनी तात्काळ दखल घेत प्रधान सचिव यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
      हिमायतनगर- हदगाव तालुक्यात 22 जुलै ते चार दिवस सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील नाल्यांना पुर ऐऊन शेतातील बांध फुटून पिके जमिनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, हाळद यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीचे रुपांतर शेततळ्यात झाले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अगोदरच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून सरसकट मदत आर्थिक मदत तात्काळ करावी अशी मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन तालुक्यातील परिस्थिती सांगितली असता मदत व पुनर्वसन मंत्री यांनी आ. जवळगावकर यांची मागणी लक्षात घेता तातडीने प्रधान सचिव यांना तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.