मणिपूर घटनेचा निषेधार्थ आदिवासी समाज बांधवांचे तहसीलदारांना निवेदन

हिमायतनगर प्रतिनिधी/ मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले असुन  त्या घटनेचे गांभीर्य तेथील राज्य आणि केंद्र सरकारने घेऊन त्या घटनेतील सर्व नराधमांना अटक करून  कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रपती यांच्याकडे तालुक्यातील आदिवासी बांधवाच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. 

       हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी समाज बांधवाच्या  वतीने बुधवारी तहसीलदार यांना मणिपूर घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले आहे. सदरील घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी तेथील केंद्र व राज्य सरकारने घटनेला खतपाणी घातले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. राष्ट्रपती यांनी सदरील घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तेथील पिढीत कुटुंबियांना  आवश्यक सहाय करून   महिलांचे संरक्षण करावे अशी मागणी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन देतांना डॉ. डि. डि. गायकवाड, गायकवाड, सत्यव्रत ढोले, एकनाथ बुरकुले, संजय मजलकर, पुंडलिक भीसे, रोशन धनवे, बालू गवले, सुनील शिरदे, शंकर बरडे, जयराम ढोले, संदीप झलके, रामराव भिसे, अर्जुन बनसोडे, अशोक डकले, रामचंद्र चेलार आदि, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.