पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज - सभापती ताडेवाड

हिमायतनगर प्रतिनिधी /शासनासह वृक्षप्रेमी वर्गाकडुन सातत्याने झाडे लावा झाडे जगवा असे आवाहन केल्या जात आहे. दुर्देवाने दिवसेंदिवस वृक्षाची संख्या कमी होत असल्याचे विदारक चित्र दिसत असल्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत चालल्याचे चित्र दिसत आहे. वृक्षांची लागवड करुन जोपासणा करणे काळाची गरज असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड

म्हणाले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधकाच्या सुचनेवरून २५ जुलै रोजी वृक्ष लागवड करण्यात आली. 
जुलै रोजी वृक्ष लागवड करण्यात आली. या प्रसंगी संचालक परमेश्वर गोपतवाड, सुभाष शिंदे, राजीव चिकनेपवाड, कर्मचारी हिलाल अहमद, पाईकराव आदिंची ऊपस्थिती होती.
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.