पावनमारी गावच्या नागरीकांना पक्का रस्ताच नसल्यामुळे नागरीकांचे हाल - आजारी वयोवृद्धांना पाठीवर बसून रुग्णालयात- आदर्श गाव टेंभुर्णी ग्रामपंचायतकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

हिमायतनगर प्रतिनिधी/( सोपान बोंपीलवार) राज्यात डासमुक्तीचा पॅटर्न राबविणाऱ्या आदर्श गाव टेंभुर्णी गट ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या पावनमारी गावच्या नागरीकांना आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही पक्का रस्ता मिळेणा हे या ग्रामस्थांचे दुर्दैव म्हणावे लागेल पावसाळ्यात कोणी नागरीक आजारी पडला तर त्या व्यक्तीला खांद्यावर घेऊन मुख्य रस्त्यावर म्हणजे दोन कि. मी. घेऊन जावे लागते अशी भयावह परिस्थिती येथील नागरीकांना सोसावी लागत असुन देखील खासदार, आमदार, प्रशासनाबदल नागरीकांतुन संताप व्यक्त होत आहे. 
          हिमायतनगर तालुक्यात डासमुक्तीचा पॅटर्न राबविण्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून महाराष्ट्रभर ओळख असलेल्या टेंभुर्णी गट ग्रामपंचायत मधील गाव पावनमारी या गावाला जाण्यासाठी मुख्य रस्ता हा पांदन रस्ता आहे. उन्हाळा, हिवाळ्यात नागरीक कसेबसे जात असतात परंतु पावसाळ्यात मात्र त्यांचे मोठे हाल पहावयास मिळत आहे. महाराष्ट्र शासन मोठा गाजावाजा करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. तर दुसरीकडे गावातील नागरीकांना पक्का रस्ता मिळत नाही पावनमारी गावची परिस्थिती पाहून दिसत आहे. येथील नागरीकांना महिला डिलीवरी, व्यक्ति आजारी पडला तर दोन कि. मी. अतंर बैल गाडी, किंवा स्वत खांद्यावर घेऊन जावे लागते हि विदारक परिस्थिती येथे आहे. झालेल्या अतिवृष्टीमुळे गत वर्षात करण्यात आलेला पुल देखील वाहून गेला त्यामुळे आणखी बिकट अवस्था झाली आहे. येथील वयोवृद्ध महिलेला छातीत दुखापत होत असल्याने वाहन गावात ऐत नाही मग स्वतच्या नातवाने पाठीवर घेऊन मुख्य रस्त्यावर नेले आणि पुन्हा हिमायतनगर येथील रुग्णालयात उपचार केले अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हि सर्व वस्तुस्थिती असुन देखील पावनमारी गावच्या नागरीकांना कायमचा पक्का रस्ता मिळत नाही खासदार, आमदार, प्रशासन हे केवळ जनतेच्या मुख्य प्रश्नावर लक्ष देत नाहीत यामुळे नागरीक मेटाकुटीस ऐत आहे. गावातील अनेक तरुणांना रोजगारासाठी दररोज खडकी गावापर्यंत पाई यावे लागते रात्रीच्या वेळी पुन्हा तिच परिस्थिती असल्याने अनेक युवकांनी प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या कामाबद्दल संताप व्यक्त केला आहे. 
तालुक्याला खडकी  यावे लागते अंधारात गावाकडे जावे लागते एकेकाळी डासमुक्तीचा पॅटर्न राबविला म्हणून टेंभुर्णी गावला जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्याधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत. परंतु याच गावातील पावनमारी गाव मात्र विकासासह सोई सुविधे पासून वंचित आहे. जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी या गावाला पक्का रस्ता करून देऊन कायमचा प्रश्न सोडवावा अशी मागणी अनिल पाटील जाधव, साहेबराव जाधव,मारोती दंतलवाड,योगेश जाधव,रोहन जाधव,दुर्गेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. 
      
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.