हिमायतनगर प्रतिनिधी(सोपान बोंपीलवार) पवित्र अधिक श्रावण पुरुषोत्तम धोंड्याचा महिन्यात परमेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने भाविकांसाठी विष्णु पुराण, भागवत,स्त्री संतचरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी या संगीतमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन परमेश्वर मंदिर ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.
हिमायतनगर शहरातील जाज्वल्य देवस्थान परमेश्वर मंदिर येथे दरवर्षी श्रावण महिन्यात कथा, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात येते यावर्षी पवित्र अधिक श्रावण पुरुषोत्तम धोंड्याच्या निमित्ताने महिनाभर तिन कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भव्य संगीतमय विष्णु पुराण कथा ह. भ. प. बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या सुमधुर वाणीतून दि. 18 जुलै ते 25 जुलै दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे.भव्य संगीतमय भागवत कथा ह. भ. प. पुज्यादेवी शामप्रिया किंकरिजी यांच्या सुमधुर वाणीतून दि. 26 जुलै ते 2 आगस्ट पर्यंत दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. भव्य संगीतमय स्त्री संतचरित्र कथा ह. भ. प. स्मिताताई आंजेगावकर महाराज यांच्या सुमधुर वाणीतून हि संगीतमय कथा दि. 3 आगस्ट ते 10 आगस्ट पर्यंत दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे.या तिन्ही संगीतमय कथा सोहळ्याचा आनंद भाविकांना महिनाभर परमेश्वर मंदिर देवस्थान येथे ऐकण्यासाठी मिळणार आहे. या संगीतमय धार्मीक कार्यक्रमात सहभागी होऊन कथा श्रवण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
