हिमायतनगर प्रतिनिधी/ आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमीत्त भक्तीमय वातावरण असतांना शहरातील राष्ट्रसाधना स्कूल च्या चिमुकल्यांची टाळ मृदगांच्या गजरात शाळेच्या वतीने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या चिमुकल्यांच्या विठ्ठल रुक्मिणीच्या वेषभुशेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हिमायतनगर शहरात धार्मिक सण उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. हि परंपरा येथील राष्ट्रासाधना इंग्लिश स्कूल ने जोपासली आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेच्या वतीने
बालदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात वारकरी वेषातील चिमुकले विद्यार्थी दिंडीतील भक्तीगीते, अभंग, हातात झेंडे हरीनामाचा गजर पंढरपूरच्या वारीची विभुती करून दिली.
शहरातील मुख्य मार्गाने हरीनामाचा गजर करीत दिंडीचा जाज्वल्य देवस्थान परमेश्वर मंदिर येथे या चिमकल्या वारकऱ्यांच्या दिंडीचे स्वागत करण्यात आले आहे. या दिंडीचे आयोजन मुख्याध्यापक अर्जुन सोमागारी, कैलास जाधव, अविनाश बोंपीलवार, वंदना पंडित, सिद्धी हिंगमिरे, रेवती सोमागारी, मोहिनी चंदनवार, पुष्पा राठोड, बजरंग गुडेटवार, सविता माने, प्रशांत सूर्यवंशी,अजय जाधव, भाग्यश्री शिंदे, स्वाती अस्तुरे, प्राची जाधव, इत्यादी शिक्षकांनी परिश्रम घेतले आहे.
