हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ वाटप करा- आ. जवळगावकर


हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेकडे पिक कर्जाच्या फायल दाखल केले असून त्या शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी तात्काळ पिक कर्ज वाटप करावे असे आवाहन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी बैठकीत केले आहे. 
हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात दि. 19 जुन रोजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या पिक कर्जा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी अमेय बर्वे, सरसम शाखेचे अधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी यांच्यासह बॅकेचे अधिकारी उपस्थित होते. बँकेचे असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पिक कर्जाच्या फायली मागणी सुरू असल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितली. यावेळी आ. माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिक कर्जाची मागणी बँकेकडे करावी ज्या शेतकऱ्यांनी फायल दाखल केल्या तात्काळ निकाली काढाव्यात अशा सुचना दिल्या. ज्या शेतकऱ्यांच्या काही तृटी असतील त्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी सोडवून शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासाठी मदत करावी असे आ. जवळगावकर म्हणाले यावेळी सहाय्यक निबंधक लक्ष्मण डवरे, गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड, तालुका आरोग्य अधिकारी पोहरे,पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के, गणेश शिंदे, परमेश्वर गोपतवाड, रमेश कदम, संजय माने, अ. आखील, शिवाजी पाटील, बाळू पाटील पोटेकर, रोशन धनवे,ज्ञानेश्वर बेंद्रे,यांच्यासह अधिकारी कर्मचारी शेतकरी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.