माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्तम कामगिरी जवळगाव ग्रामपंचायतचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान



हिमायतनगर प्रतिनिधी/(सोपान बोंपीलवार) 
पंचतत्वाचे संवर्धन संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जवळगाव ग्रामपंचायत तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड यांनी  महाराष्ट्र राज्यस्तरीय 2500-5000 लोकसंख्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे . माझी वसुंधरा अभियान 3.0 चे आज पर्यावरण दिनी माननीय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे, यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना जवळगाव नगरीचे भूमिपुत्र माननीय आमदार श्री माधवराव पाटील जळगावकर, सरपंच सौ.प्रतीक्षा नितेश पवार, श्री शैलेंद्र वडजकर ग्राम विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सौ. मनीषा कापसे, गटविकास अधिकारी श्री मयूरकुमार अंदेलवाड, उपसरपंच श्री सुभाष माने ग्रामपंचायत सदस्य रामदास पवार ,प्रमोद गौर, सतीश वराडे गणेश नाचारे, रुकमिनबाई केशव बासरकर, पांडुरंग पवार, केशव बासरकर
 अभियानात केलेले कामे 
 *हरित अच्छादन वाढवण्यासाठी लोकसभागातून व श्रमदानातून माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये 7000 वृक्षांची लागवड व माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये 3800 वृक्षांची लागवड करण्यात आली.
 * मीयावाकी पद्धतीने   वृक्षांची आनंदवन घनवन लागवड करण्यात आली.
 *कमी जागेत जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मितीसाठी सुमारे दहा हजार तुळशीची लागवड करण्यात आली. 
* रस्ता दुतर्फा 3000 वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आले.             *गावातील सर्व वर्षांचा वृक्ष गणना अहवाल व वारसा झाडांचा अहवाल पूर्ण करण्यात आला असून ग्रामपंचायतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 *गावात दररोज घंटागाडीने ओल्या व सुक्या कचऱ्याचे संकलन करण्यात येते व त्यापासून गांडूळ व कंपोस्ट खत निर्मिती करण्यात  येते. *ग्रामपंचायतचा गांडूळ खत व कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प असून सदर ठिकाणी गांडूळ खताची विक्री केंद्र व प्लास्टिक कचरा संकलन केंद्र व ई कचरा संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहे .FCO NORMS प्रयोगशाळे तून सदरील खताचा गुणवत्ता अहवाल घेण्यात आला आहे.
 *ग्रामपंचायत ने पाच ते सात फुट उंचीच्या सुमारे दहा हजार झाडांची रोपवाटिका तयार केली असून गावातच लोकांना रोपे उपलब्ध करून दिली जातात.
 *गावात नव्याने दहा हरिक्षेत्रे तयार करण्यात आले.                    *माझी वसुंधराचे तत्त्व दर्शविणारे विविध ठिकाणी 12  स्थळ निर्माण करण्यात आले.
* गावातील सर्व शासकीय इमारतीवर सोलर स्थापना करण्यात आली असून, वॉटर हार्वेस्टिंग चे काम पूर्ण करण्यात आले आहे.             
*ग्रामपंचायतीने गावात पाच हजार लिटर सोलर वॉटर हिटर स्थापन करून गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे                *गावातील 6 पंपावर सोलर पंप बसविण्यात आले आहेत. 
*गावातील स्ट्रीट लाईट पोल पैकी 30 पोलवर सोलार दिवे स्थापन करण्यात आले असून दीडशे पोलवर एलईडी ची स्थापना करण्यात आली आहे.
* गावात प्लास्टिक बंदी फटाके बंदी कृषी कचरा जाळण्याबाबत बंदी इत्यादी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविन्यात  आले आहे.
 *नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये गावामध्ये पाच ठिकाणी मोबाईल चार्जिंग स्टेशन व तीन ठिकाणी बाईक चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत.
* ग्रामपंचायत जवळगाव सदर वर्षात ODF प्लस जाहीर करण्यात आली आहे. 
*सहा वायू गुणवत्ता अहवाल सादर करण्यात आले असून सणाच्या कालावधीतील वायु गुणवत्ता अहवाल सादर करण्यात आला आहे.
* जैव विविधता नोंदवही तयार करण्यात आली आहे.                             
 * गावात लोकसभागातून मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यातील गाळ काढणे व वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे.           
   *गावात 15 ठिकाणी लिच पीट  व 50 शोष खड्ड्याची निर्मिती करण्यात आली आहे.               *** अभियान कालावधीत गावात लोक वर्गणीतून पंधरा ते वीस लक्ष रुपयाची कामे पूर्ण करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.