हिमायतनगर प्रतिनिधी/ राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनाचा वतीने ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
कारला पिचोंडी ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कारासाठी कारला येथील भारतीय जवान धोंडीबा एटलेवाड यांच्या मातोश्री सखुबाई किशन एटलेवाड यांची निवड करण्यात आली तर पिचोंडी येथील सुशीला मिराशे यांची निवड करण्यात आली होती.
त्या महिलांचा ग्रामपंचायत च्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर ट्राफी सन्मानचिन्ह पाचशे रुपये रोख धनादेश श्रीफळ देउन सरपंच गजानन कदम,पोलीस पाटील कैलास डुडुळे ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार, रामेश्वर यमजलवाड, सौ. अजंनाबाई चिंतलवाड, रामा मिराशे, गजानन मिराशे, अ. रज्जाक भाई,रामराव लुम्दे, चंद्रकांत घोडगे,आडेलू चपलवाड, डॉ गफार,मारोती जूकूंटवाड,अंगणवाडी मदतनीस सौ. सुनिता मोरे,सौ.वैजंताबाई अचमवाड ,सौ.अनुसयाबाई यमजलवाड, सौ. अशाबाई गोखले, सौ. गोकुर्णाबाई कांबळे, सौ. गोकुर्णाबाई गोखले,अगंद सुरोशे,तुकाराम कदम, मधुकर घोडगे, नागसेन गोखले, रामराव पाटील, दत्ता चिंतलवाड, ग्यानबा इटेवाड,देवराव कोंडेवाड,तुकाराम ताटेवाड,अंकुश नंदेवाड,लक्ष्मण ढाणके, आनंद ढाणके,साहेबराव घोडगे, यांच्यासह गावातील महिला पुरुष या पुरस्कार सन्मान सोहळ्यास उपस्थित होते.
