आ. जवळगावकरांच्या प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेला मंजूरी - पिचोंडी येथे सार्वजनिक विहिरीच्या कामाला सुरुवात

हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला गट ग्रामपंचायत असलेल्या पिचोंडी गावासाठी जलजिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेला मंजूरी मिळाली असून विहीर खोदकामाला सुरूवात करण्यात आहे. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नातून झालेल्या कामाला यश मिळाले आहे. 
      तालुक्यातील पिचोंडी हे अदिवासी बहूल गाव असून गेल्या अनेक वर्षापासून गावात भिषण पाणी टंचाई निर्माण होत असल्याने नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. सध्या गावात अधिग्रहण करून ग्रामपंचायत ने पाण्याची व्यवस्था केली आहे.नवनिर्वाचित ग्रामपंचायत निवडून आल्यानंतर आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कडे गावाला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. सदरील मागणीनुसार आ. जवळगावकर यांनी प्रस्ताव पाठवून पिचोंडी गावचा जलजिवन मिशन योजनेत समाविष्ट करून येथे जलजिवन मिशन योजना अतंर्गत 62 लाख 36 हजार रुपये मंंजूर केले असून यातून गावासाठी सार्वजनिक विहीर, पाण्याची टाकी, नळ योजना अशी कामे होणार आहेत. पाणी पुरवठा टाकीच्या बांधकामे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. आ. जवळगावकर यांनी केलेल्या कामाचे कारला पिचोंडी ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. सदरील योजनेतील सार्वजनिक विहिरीच्या कामाचे भूमिपूजन सरपंच गजानन कदम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी कनिष्ठ अभियंता निखिल कोमलवार,कंत्राटदार पवार, उपसरपंच रोशन धनवे,पोलीस पाटील कैलास डुडुळे, तंटामुक्त अध्यक्ष डॉ गफार,ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार, गजानन मिराशे, बाबाराव डवरे, रामा मिराशे,तुकाराम कदम,वानखेडे, यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

आ. जवळगावकरांच्या प्रयत्नातून कारला पिचोंडी गावचा विकास- बोंपीलवार
आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी कारला पिचोंडी गावाला दोन वर्षात भरिव निधी देऊन विकासाला चालना दिली असून कारला गावाला जोडल्या जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, ग्रेनेड पाणी पुरवठा योजना, राजा भगीरथ सभागृह,पादंन रस्ता, पिचोंडी जलजिवन मिशन पाणी पुरवठा योजना, ठक्कर बाप्पा योजनेतून पाच लाख मंजूर केले यासह अनेक कामे मंजूर झाली असून कामे प्रगतीपथावर सुरू असल्याने विकासाला चालना मिळाली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार म्हणाले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.