हिमायतनगर प्रतिनिधी/ गेल्या आठवड्यापासून उन्हाचा पार वाढता असुन या उन्हाच्या तीव्रतेने शनिवारी पळसपूर येथील अचानक दुपारच्या वेळी आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असुन या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने कुटुंबिय उघड्यावर आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील ग्रामपंचायत चे पाणी पुरवठा कर्मचारी राजीव चांदणकर, साईनाथ चांदनकर यांच्या राहत्या घराला शनिवारी दुपारी अचानक आग लागली या आगीच्या घटनेत घरावरील पत्रासह घरातील गहू, ज्वारी, कुलर दुकानचे साहित्य यासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असुन यात जवळपास एक लाख रुपये नुकसान झाले आहे. शनिवार दिवसभर अतिशय उन्हाचे तापमान वाढले होते त्यामुळे या उन्हाच्या तीव्रता वाढल्यामुळे सदरील घराला आग लागली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. लागलेल्या आगीमुळे सदरील कुटुंबिय उघड्यावर आले असून जळालेल्या घराचा पंचनामा करून सदरील घरमालकांना शासनाने मदत करावी अशी मागणी सरपंच मारोती वाडेकर यांनी तहसीलदार तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे केली आहे.
