हिमायतनगर प्रतिनिधी/ दासरी माला दासरी समाजाचा मुळ व्यवसाय दातोन कुंकू विकून उदरनिर्वाह धकवणाऱ्या आई वडिलांचे स्वप्न साकार करणाऱ्या किशोर सादुलवार यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली असून त्यांचा आदर्श युवकांनी घेऊन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे असे उदगार आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.
भोकर येथील बंडू सादुलवार यांनी आपल्या समाजातील पारंपरिक व्यवसाय डोक्यावर टोपली, घेऊन सकाळी उठल्यापासून खेडोपाडी व्यवसाय करून दोन चारशे कमाउन त्यातून मुलाचे शिक्षण आणि संसार चालवायचा त्याच कमाईतून पहिला मुलगा ज्ञानेश्वर सादुलवार हा हवाई दलात कन्याकुमारी येथे आहे. तर दुसरा मुलगा अमोल सादुलवार हा सीए बनला त. यानंतर किशोर सादुलवार हा एमपीएससी परीक्षेत यशस्वी होऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे.
दासरी माला दासरी समाजातील पहिला तरूण मोठ्या पदावर यशस्वी झाल्याने त्यांचे समाजाच्या वतीने कौतुक होत आहे.आई वडील व मुलांचा आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आणि समाजातील तरुणांनी किशोर सादुलवार सारखे ध्येय साध्य केले पाहिजे असे सांगितले. यावेळी मुरहारी यंगलवार, सुरेश यंगलवार, गणराज सादुलवार, बालाजी सादुलवार,रामदास बोंपीलवार,गोविंद गोडसेलवार ,गोविंद चेपूरवार, राजेश पोराजवार,विनोद बोंपीलवार,वैजनाथ चेपूरवार, पांडुरंग सादुलवार,आलडवार,यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती.
