हिमायतनगर प्रतिनिधी/ गेल्या तिस वर्षापासून कांग्रेस पक्ष आणि जवळगावकर घराण्याशी अतिशय एकनिष्ठ पणे राहून वेळोवेळी पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांना आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सभापती पदाची जबाबदारी दिली ती संचालकांना आदर्शवत असुन कांग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिल्याने पदाची संधी मिळतेच अशी भावना नवनिर्वाचित संचालक परमेश्वर गोपतवाड यांनी व्यक्त केली आहे.
हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत कांग्रेस पक्षाच्या 18 पैकी 18 जागा निवडून आणण्यात आ. माधवराव पाटील जवळगावकर याना यश मिळाले आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातून परमेश्वर गोपतवाड यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत.
त्यामुळे परमेश्वर गोपतवाड यांना सभापती पदाची संधी मिळणार असल्याची चर्चा होती. परंतु पक्षश्रेष्ठी नी घेतलेला निर्णय अंतिम असणार आहे यावर संचालकही ठाम होते. गेल्या तिस वर्षापासून कांग्रेस पक्षाशी आणि जवळगावकर घराण्याशी एकनिष्ठपणे राहून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेले कांग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन ताडेवाड यांची सभापतीपदी वर्णि लागली आहे.
नवनिर्वाचित सभापती जनार्दन ताडेवाड, तर उपसभापती म्हणून रमेश कदम यांना संधी मिळाली. सभापती उपसभापती यांचा पदग्रहण सोहळा आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या सोहळ्यात नवनिर्वाचित संचालक परमेश्वर गोपतवाड बोलतांना म्हणाले की आ. जवळगावकर यांनी सभापती पदावर कुणाला विराजमान करतील त्यांच्या निर्णयाशी आम्ही निवडून आलेले संचालक सहमत आहोत.आ.जवळगावकर यांनी कांग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलेली संधी अनमोल आहे भविष्यात आपण कांग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यास आ. जवळगावकर संधी मिळणार असल्याचे परमेश्वर गोपतवाड म्हणाले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, माजी संचालक गणेशराव शिंदे, माजी संचालक शेख रफिकभाई, अ. अखिल, समद खान,डॉ प्रकाश वानखेडे, संजय माने, गोविंद बंडेवार, अशोक अनगुलवार, गजानन सुर्यवंशी, संजय पाटील, योगेश चिलकावार,दत्ता कोंकेवाड, अॅड अतुल वानखेडे, सोपान बोंपीलवार , दत्ता पुपलवाड, प्रविण जाधव, शेख रहिमभाई, अ. बाकी भाई, हानिप सर, यांच्यासह नवनिर्वाचित संचालक कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
