नवनिर्वाचित सभापती उपसभापतीने प्रामाणिकपणे काम करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे- आ. जवळगावकर


हिमायतनगर प्रतिनिधी(सोपान बोंपीलवार) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांसह व्यापारी बांधवांच्या प्रश्न सोडवून प्रामाणिकपणे काम करून शेतकरी व्यापाऱ्यांना सेवा दिली पाहिजे असे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे. 
      हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती यांच्या पदग्रहण सोहळा गुरूवारी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे. या सोहळ्यात सभापती जनार्दन ताडेवाड उपसभापती रमेश कदम यांचा आ. जवळगावकर यांच्या हस्ते सत्कार करून पदावर विराजमान केले.
 या प्रसंगी बोलताना आ. जवळगावकर म्हणाले की तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, उपचेअरमन, सेवा सहकारी सोसायटी संचालकांनी केलेल्या सहकार्याने एकहाती सत्ता मिळवण्यात यश मिळाले असून नवनिर्वाचित संचालकांच्या एकमताने सभापती उपसभापती पद मिळाले असून पदाचा मोह न बाळगता शेतकरी व्यापारी बांधवांचे प्रश्न सोडवले पाहिजे येणाऱ्या काळात गाळे बांधकामाचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवून पाठपुरावा करावा आणि लवकरच बिट पद्धत सुरू केली जाणार असल्याचे
 आ. जवळगावकर म्हणाले यावेळी सभापती जनार्दन ताडेवाड ,उपसभापती रमेश कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, माजी संचालक शेख रफिकभाई, संचालक परमेश्वर गोपतवाड, डॉ प्रकाश वानखेडे,गणेशराव शिंदे,शिवाजी पाटील, अॅड अतुल वानखेडे,अ.आखिल ,समद खान, संजय माने, गजानन सुर्यवंशी,योगेश चिलकावार, संजय पाटील,ज्ञानेश्वर शिंदे, सुभाष शिंदे,सचिव नागोराव माने, सोपान बोंपीलवार, दत्ता पुपलवाड, प्रविण जाधव, गोविंद बंडेवार, अ. बाकी भाई, हानिफ सर, यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.