हिमायतनगर प्रतिनिधी/ केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा तामसा माजी मुख्याध्यापक कै. मारोतराव रणखांब सर यांचे नातू तथा हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय हिमायतनगर चे प्राचार्य गजानन रणखांब सर यांचे चिरंजीव पवन गजानन रणखांब याची ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) या केंद्र शासनाच्या कंपनीमध्ये 24 लाखाच्या वार्षिक पॅकेज सह अभियंता या पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. पवन रणखांब याने बी टेक ची पदवी नांदेड येथील एस जी जी एस महाविद्यालय येथे पूर्ण असून त्यानंतर चे पुढील शिक्षण तामिळनाडू च्या तिरुचिरापल्ली येथील एनआयटी महाविद्यालयात सुरू असतांना निवडीचे पत्र प्राप्त झाले. या निवडीने तामसा व हिमायतनगर शहरात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
