हिमायतनगर तालुक्यातील गावो गावी पाणी टंचाईच्या झळा-पाणी टंचाई आराखडा बैठकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष- अधिग्रहण चे अनुदान मिळेणा

हिमायतनगर प्रतिनिधी(सोपान बोंपीलवार) उन्हाळ्याचे कडक तापमान वाढत असतांना अनेक गावातील पाणी पातळी खालावली असुन गावोगावी असलेले हातपंप, बोअर, विहीरी आटल्या असल्यामुळे भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असली तरी मार्च संपला तरी प्रशासनाने अद्यापही पाणी टंचाई आराखडा बैठक घेतली नाही अधिग्रहणचे प्रस्ताव देखील पंचायत समिती स्तरावरून स्विकारले जात नसल्यामुळे गावोगाव च्या सरपंच, ग्रामसेवकांना पाण्यासाठी नागरीकांना तोंड देण्याची वेळ आली आहे. 

  हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रात गेल्या तिन महिन्यापासून ठणठणाट असल्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावातील नळ योजना बंद पडल्या आहेत त्यामुळे जनावरासह नागरिकांना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर तालुक्यातील अनेक गावात असणारे विहीरी, बोअर मार्च महिन्यात बंद पडले आहेत. सार्वजनिक विहिरींना पाणी नाही तर काही ठिकाणी पाईपलाईन नसल्या कारणाने गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचायत समिती स्तरावर दरवर्षी डिसेंबर महिन्यात पाणी टंचाई आराखडा बैठक आयोजित करण्यात येते परंतु यावर्षी या बैठकीचा प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून मोबदला मिळाला नसल्यामुळे या वर्षी शेतकरी पाणी देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. सदरील शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मोबदला दिला पाहिजे तरच पुढील अधिग्रहण करून देऊ अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे. 
उन्हाळ्यात चार महिने काही बोअर , विहीर अधिग्रहण करून नागरीकांना पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत कडून टॅंकर द्वारे करून द्यावी लागते परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अनेक गावात वाडी तांड्यावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी,तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी पाणी टंचाई आराखडा बैठक बोलावून तालुक्यातील ग्रामीण भागातील उन्हाळ्यात भेडसावणारा पाणी टंचाई चा प्रश्न सोडवावा अशी मागणी सरपंच बांधवांनी केली आहे. गावातील विहीर बोअर कोरडेठाक पडले असल्याने नागरीकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांना अनेकदा सांगून देखील पाणी प्रश्न सुटत नसल्याने प्रशासनाने तरी गंभीरता घेऊन पाणी टंचाई दुर करावी अशी मागणी नागरीकातून होते आहे. 

अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान वाटप करा- सरपंच परमेश्वर गोपतवाड

 उन्हाळ्यात गावात पाणी पुरवठा करण्यासाठी टंचाई आराखडा करतांना काही शेतकऱ्यांचे विहीर, बोअर अधिग्रहण करण्यात येतात अशा तालुक्यातील अनेक गावच्या शेतकऱ्यांचे अधिग्रहण ग्रामपंचायत मार्फत गत वर्षात करण्यात आले होते. त्या शेतकऱ्यांना दोन वर्षापासून अद्यापही अनुदान मिळाले नसल्याने यावर्षी पाणी टंचाई काळात अधिग्रहण करून देण्यासाठी शेतकरी टाळाटाळ करीत आहेत.तहसिल,पंचायत समिती स्तरावरून सदरील अधिग्रहण अनुदान तात्काळ देऊन नविन अधिग्रहणाचे प्रस्ताव स्विकारण्यात यावे अशी मागणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.