हिमायतनगर प्रतिनिधी( श्रीनिवास बोंपीलवार) हनुमान जन्मोत्सव निमित्ताने तिर्थक्षेत्र बोरगडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम कथा सोहळ्याची सुरूवात दि. 30 मार्च पासून झाली असून दि. 7 एप्रिल पर्यंत भक्तीमय चालणार असुन या सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मारोती मंदिर ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील तिर्थक्षेत्र बोरगडी येथे रामजन्मोत्सव व हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भव्य श्रीराम कथा सोहळ्यास दि. 30 मार्च पासून प्रारंभ झाला असून 7 एप्रिल पर्यंत चालणार आहे. या सप्ताहाचे मार्गदर्शक ह. भ. प. माधव महाराज, श्री ज्ञानेश्वरी पारायण मुख्य ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली, रामकथा प्रवक्ते रामायणाचार्य कृष्णकृपामुर्ती ह. भ. प. लक्ष्मण महाराज बोरगडीकर, श्रीराम जन्मोत्सव कथा वेळ सकाळी 10 ते 12 हरिपाठ व गाथा भजन, व्यासपीठ ह. भ. प. पुंडलीक महाराज चोपदार, दि. 6 एप्रिल रोजी सकाळी 5 ते 6.30 मारुतीरायाचा जन्म अभिषेक पुरोहित श्री कांतागुरु वाळके यांच्या हस्ते होणार आहे.
या सप्ताहातील कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी 1 ते 4 संगीतमय रामकथा संध्याकाळी हरिपाठ,दररोज रात्रीचे हरिकीर्तन ह. भ. प. पांडुरंग महाराज येळेगावकर, ह. भ. प. डॉ लक्ष्मीकांत रावते, ह. भ. प.निळोबा महाराज हरबळकर, ह. भ. प.सुदाम महाराज पिंपळदरीकर, ह. भ. प.सुनील महाराज लांजुळकर, ह. भ. प.नारायण महाराज सोंडेगावकर, ह. भ. प.गणेश महाराज राठोड, ह. भ. प.सदानंद महाराज फळेकर यांच्या काल्याच्या कीर्तन होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या संगीत श्रीराम कथा सोहळा रामायणाचार्य कृष्णकृपामुर्ती ह. भ. प. लक्ष्मण महाराज बोरगडीकर यांच्या रसाळ सुमधुर वाणीतून सुरू आहे. या कथेला संगीत वादणाची साथ नादब्रह्म संगीत संचालक सचिन बोंपीलवार देत आहेत.
हि कथा ऐकण्यासाठी भाविकांची दिवसभर गर्दी होत आहे. दि. 7 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य कुस्त्या होणार आहेत.या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम कथा सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री मारोती मंदिर ट्रस्ट कमेटी बोरगडी व श्री चैतन्य भागवत सांप्रदाय प्रसार संस्था उपशाखा बोरगडी व ग्रामस्थांनी केले आहे.
