हिमायतनगर प्रतिनिधी/श्री परमेश्वर देवस्थान यात्रा कमेटीच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांसाठी विविध कला, गुण दर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सायप्रस इंग्लिश मिडीयम स्कूल खडकी फाटा येथील चिमूकल्या विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवून, अरे संसार संसार हे लक्षवेधी गीत सादर करून प्रेक्षकांची वाहवाह मिळविली. परमेश्वर देवस्थान कमेटीच्या आयोजित स्पर्धेत हे गीत पहिल्या क्रमांकाचे ठरले असून त्यांना ११ हजार एक रूपयाचे बक्षीस प्राप्त झाले. असून मंदिर कमिटीच्या वतीने नियोजित बक्षीसाचे वितरण करण्यात आले आहे.
या स्पर्धेत कु. श्रद्धा कप्पलवाड, कु. साक्षी सुर्यवंशी, कु. तणूष्का पंगीरवाड, कु. माहेश्वरी वानखेडे, कु. तेजस्विनी जाधव, कु. संध्या भुषणवाड, कु. शिवानी जट्ट, कु. कल्याणी सुर्यवंशी, कु. सायली खांडरे , कु. श्रीया मोरे, यश राठोड, आदीं विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. व तसेच स्टोरी ऑफ सोल्जर या गीतात यश माने, जय राठोड, सक्षम नारखेडे, सात्विक सुर्यवंशी, प्राशिक कांबळे, सुकालाल राठोड, विश्वजीत माने, मयूर राठोड, सम्यक कांबळे, रूद्र जैस्वाल, आम्रत लिंगमपल्ले, तय्यब पिंजारी आदि विद्यार्थ्याचा सहभाग होता. तर वरील सर्व बाल विद्यार्थ्याना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप आला राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मु. अ. दिनेश राठोड, सहशिक्षक वर्षा मोरे, शहनाज फातीमा, सपना ताटिकुंडलवार , स्मिता लोखंडे, दुर्गा सुलभेवार, अंजली येरेकार, श्रद्धा दमकोंडवार, रेखा राठोड, विष्णू चव्हाण आदी शिक्षक, शिक्षीकांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदरील शाळेत शिकत असलेले सर्व चिमुकले विद्यार्थी हे शेतकरी, मजूरदार गोर गरिबांची आहेत. अल्पावधीतच शाळेने विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव देऊन उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून चिमूकल्याचे मोठे कौतुक होत आहे.
