हिमायतनगर प्रतिनिधी/ परमेश्वर यात्रा उत्सव सुरू असुन या यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत विदर्भासह - आंध्रप्रदेशातील भजनी मंडळानी सहभाग घेतला होता यामध्ये नांदेड येथील नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या कलाकारांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
हिमायतनगर शहरातील आराध्य दैवत परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत नादब्रह्म संगीत विद्यालय नांदेड, गणेश भजनी मंडळ राहूर महागाव, जय भवानी भजनी मंडळ काळी टेंभी महागाव, विनायक भजनी मंडळ नागेशवाडी ता. महागाव,पांडुरंग भजनी मंडळ कुबेर ता. मुधोळ, यासह एकुण 18 भजनी मंडळानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत नांदेड येथील सचिन बोंपीलवार यांच्या नादब्रह्म संगीत विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या कलाकारांनी अतिशय सुंदर असे गायण केले होते त्यांच्या कलेचे गुण पाहून प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. गायक ज्ञानेश्वर तोषटवाड,गणेश हाके,शिवाजी विभुते,प्रणव पडोळे,उदय जाधव यांनी केले तर तबल्याची साथ : सचिन बोंपिलवार पखवाजवादक :कृष्णा बोंपिलवार यांनी केली या कलाकारांचा परमेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने बक्षीस देऊन सन्मान केला यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविर श्रीश्रीमाळ ,संचालक प्रकाश शिंदे, संजय माने, विलास वानखेडे, विठ्ठल ठाकरे, गजानन मुतलवाड, संतोष गाजेवार, सुभाष शिंदे, गोविंद बंडेवार, गोविंद शिंदे उपस्थित होते.
