सवना ज गावाच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही...आ.जवळगावकर

 
हिमायतनगर प्रतिनिधी/तालुक्यातील सवना ज येथील युवक, तरुणांसह गावकरी बांधवांनी सदैव केलेल्या सहकार्याची आठवण आहे.गावातील पाणी पुरवठ्यासाठी कोटींच्या वर निधी देण्यात यश आले आहे.काही दिवसांत नवीन नळयोजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे.युवकाची भावना लक्षात घेऊन जीम साठी स्थानिक विकास निधीतून सहकार्य करणार असुन शिवाजी चौकासाठी शक्य तेवढे सहकार्य करण्याची ग्वाही आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिली... सवना ज येथे २६ फेब्रुवारी रोजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट दिली होती.यावेळी त्यांच्या सोबत रफिकभाई, गणेशराव शिंदे,जनार्दन ताडेवाड, डॉ अन्वरभाई आदिंची ऊपस्थिती होती.यावेळी सरपंच, ऊपसरपंच,ग्रा.प.सदस्यासह गावकरी आणि युवा वर्गानी सवना ज येथील बौद्ध विहार ते पार्डी ज रस्ता, अण्णाभाऊ साठे सभागृह,जीम साठी साहित्य, भारत गटकपवाड ते संजय गायकवाड यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता देण्याची मागणी केली.यावेळी पुढे बोलताना आ.जवळगावकर म्हणाले की, सवना ज येथे यापूर्वी बौद्ध विहार,दलीत वस्तीत सिमेंट रस्ता, बंदिस्त नाली, सिध्देश्वर मंदिर सभागृह आमदार स्थानिक विकास निधीतून दिले आहे.सवना ज ते रमणवाडी,खटकाळी ते बाराळी पांदण रस्ता मंजुर केला आहे.आपण केलेल्या मागणीची दखल घेऊन मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.यावेळी युवक गणेश जाधव, दिगंबर अनगुलवार,शिवराज गायकवाड,करण धबडगे, प्रशांत भुसाळे यांनी आ.जवळगावकर यांचा सत्कार केला.याप्रसगी सरपंच परमेश्वर गोपतवाड, ऊपसरपंच सोनबा राऊत,ग्रा.प.सदस्य सिध्दार्थ राऊत, संदिप बिरकलवार, नंदकुमार राऊत, संजय राऊत, मारोतराव पाटील आक्कलवाड, गजानन गोपेवाड, लक्ष्मण राऊत, सोनबा अनगुलवार, विनायक शिंदे, संतोष संभाजी अनगुलवार,आनंद गोपेवाड, राजीव जाधव, गुलाब भुसाळे, अरविंद बिरकलवार, सुनील गुंडेकर, संतोष जाधव, गजानन आक्कलवाड, गंगाराम पुजरवाड, योगेश अनगुलवार, शिवाजी गोपेवाड, शंभुराजे गोपेवाड,किशु बिरकलवार यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.