हिमायतनगर शहरातील सराफा व्यापारी मिलिंद जन्नावार यांचे निधन

हिमायतनगर शहरातील प्रसिध्द सराफा व्यापारी मिलिंद सुदर्शन जन्नावार यांचं अल्पशा आजाराने हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झालं. मृत्यूसमयी ते 53 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर उदय दि.१५ रविवारी सकाळी १0 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

मागील दोन-तीन दिवसापासून त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना हैद्राबाद येथील आपोलो रुग्णालयात हलण्यात आलं होतं. वैद्यकिय पथकाने अथक प्रयत्न करून उपयोग झाला नाही. दिनांक 14 शनिवारी 4 वाजेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
, या घटनेमुळे हिमायतनगर शहरासह तालुक्यातुन हळहळ व्यक्त केली जात असुन, सर्वत्र शोककळा पसरली आहे.सराफा व्यापारी, जन्नावार ज्वेलर्सच्या नावाने त्यांची सर्वदुर ओळख होती त्यांच्या निधनानंतर शहर व तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, 2 मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.15 रोजी सकाळी 10 वाजता शहरातील बोरगडी रोडवर असलेल्या वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.