हिमायतनगर प्रतिनिधी/ भगीरथ राजांनी आपल्या साठ हजार पूर्वजांच्या उध्दार करण्यासाठी संकल्प केला होता. भगवान भोलेनाथांची प्रार्थना करून स्वरगातील गंगा पृथ्वी तलावर आणली आणि राजा भगीरथांचा संकल्प सिद्धीला गेला साधना केल्यानंतर ज्ञानाची गंगा वाहिली भगीरथांच्या प्रयत्नाने पूर्वजांचा उद्धार झाला असे किर्तनकार ह.भ.प.नरसिंग महाराज केरूळकर यांनी सांगितले.
कारला येथे राजा भगीरथ यांच्या जयंती सोहळ्या निमित्ताने ह.भ.प.नरसिंग महाराज केरूळकर यांच्या हरी किर्तन सोहळ्याचे आयोजन बेलदार समाज बांधवांनी केले.या जयंती निमित्त आयोजित किर्तन सेवत राजा भगीरथांचे वर्णन करताना ह. भ. प. नरसिंग महाराज म्हणाले की सध्या हिंदू समाज धर्मातील रिती रिवाज विसरज चालला आहे. साधू संताच्या परंपरा पिढ्यान पिढ्या चालू ठेवल्या पाहिजे त्या परंपरेचा पाईक प्रत्येकाने झाले पाहिजे. राजा भगीरथा सारखे वंशज जन्माला आल्यावर कुळाचा उध्दार झाला म्हणून आजच्या पिढीला देखील चांगले पुत्र जन्माला येणे गरजेचे आहे. समाजात माणसे संकुचित विचाराने वागत आहेत. घरातील संस्कार टिकून राहिले त्यामुळे संतती देखील बिघडत चालली आहे. राजा भगीरथांनी कुळाचा उद्धार करण्यासाठी स्वरगातील गंगा पृथ्वी तलावर आणली भगीरथा सारख्या संताच्या विचाराची गरज सध्याच्या पिढीला आहे असे किर्तनात म्हणाले आहे.दहीहंडी फोडून महाप्रसादाच्या पंगतीने सांगता झाली.जयंती निमित्त्ताने कारला येथील बेलदार समाजातील तरूणांनी समाजाच्या सहकार्यातून भगीरथ संस्थान साठी साऊंड सिस्टीम, मंडप डेकोरेशन घेऊन आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याचे समाजातून कौतुक होत आहे.जयंती निमित्त राजा भगीरथ दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती.
