हिमायतनगर शहरातील उपजिल्हा रूग्णालयाच्या इमारतीचे काम त्वरित पूर्ण करा- जिल्हा शल्यचिकित्सक भोसीकर यांची भेट

हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील ग्रामीण रुग्णालयास 
  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी शनिवारी भेट देऊन उपजिल्हा रूग्णालयाच्या इमारतीच्या कामाची पाहणी केली असून इमारतीचे काम वेळेत पूर्ण करून देण्याचे आदेशीत केले असून उपजिल्हा रूग्णालयामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे . 

शहरातील ग्रामीण रुग्णालयास शनिवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व आरएमओ मा. डॉ. राजाभाऊ बुटे यांनी भेट दिली.ग्रामीण रुग्णालयाच्या पाठिमागे सुरू असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाची पाहणी केली .सदरील बांधकाम प्रगतीपथावर असून बांधकामाच्या गुत्तेदाराला 31 मार्च 2023 पर्यंत बांधकाम पूर्ण करून देण्याची आदेशित केले आहे. उपस्थित डॉक्टरांना गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याचेही आदेश दिले.येथील उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यास येथे वैद्यकीय अधिकारी, आधीपरिचारिका व इतर कर्मचारी वर्गाचे मनुष्यबळ वाढेल, आणि रुग्णांना अधिक चांगला वैद्यकीय उपचार मिळेल असे माननीय जिल्हा शल्यचिकित्सक भोसीकर यांनी सांगितले, तसेच सर्व ग्रामीण रुग्णालय व रुग्णालयाचा परिसर पाहणी करून रुग्णालयाचे कामकाज व रुग्णालय स्वच्छता, आणि स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया चे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. डी. गायकवाड यांचे अभिनंदन केले व ग्रामीण रुग्णालयीन कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले .यावेळी रुग्णालयातील डॉ. शुभांगी माने , डॉ. माधव भुर्के, डॉ.मुनेश्वर, श्रीमती चिंचलवाड,श्रीमती पैठणे,श्रीमती कोंके, श्रीमती सोनाळे, श्री वाघमारे, श्री राठोड,श्री धांडे,श्री इंगोले, श्री कल्याणकर,श्री गजानन, श्री साबळे, शे रमजान तसेच रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.