हिमायतनगर... प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक विद्यालया पर्यंत क्रीडा ची तासीका असतात.विदयार्थी अवस्थे पासून सर्वच विद्यार्थ्यांनी लेझीम स्पर्धा असो अथवा क्रिडा विषयक स्पर्धेत हिरीरीने सहभागी होणे स्वतः साठी हिताचे ठरु शकते असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक बिरप्पा भुसनुर यांनी केले. तालुक्यातील पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ मंदीर यात्रेमहोत्सवास लेझीम स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळया प्रसंगी भुसनूर बोलत होते. २ जानेवारी रोजी दुपारी लेझीम स्पर्धा संपन्न झाली.यावेळी पुढे बोलताना पो.नि.भुसनूर म्हणाले की, शालेय अवस्थेत शिक्षणा बरोबर क्रिडा क्षेत्रांत सातत्याने सहभाग दर्शविला भविष्यात आपल्या फायद्याचे ठरु शकते.विद्यार्थ्यानी पहिल्यांदा शिक्षणाकडे आकर्षित होऊन स्वतःला झोकून देत असताना क्रिडा विभागाकडे ही लक्ष द्यावे असे आवाहन केले.
लेझीम स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी अवस्थेत जडणघडणीला वाव- पो.नि.भुसनूर
0
January 05, 2023
