हिमायतनगर तालुक्यातील...पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ मंदीर यात्रेमहोत्सवात ३ जानेवारी रोजी व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भोगे यांच्या हस्ते करण्यात आला.या स्पर्धेत तेलंगणातील मुधोळ तालुका, नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर,किनवट तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळपास २२ संघाने सहभाग घेतला होता.गजानन बुरकुले,पवन आडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न झाल्या.शुभारभ प्रसंगी जिरोणा किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी रणवीर, कृषी सहायक गणेशराव बिल्लेवाड,प.स.चे गजानन पतंगे, ग्रामसेवक शिवाजी शिरारपलु,कासटवार, सरपंच बळवंत जाधव, पोलिस जमादार रंगराव राठोड पोलिस पाटील सौ.ज्योतीताई मिराशे, ऊपसरपंच रोशन धनवे, सरपंच सुनील शिरडे, सरपंच शंकरराव वागतकर,सरपच गुलाब राठोड, सरपंच सुरेश रौतुलवाड,एम पी डब्लु अशोकराव गायकवाड,डोखळे यांच्या सह परीसरातील भाविकांची उपस्थिती होती.या स्पर्धेचे पहिले बक्षीस माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषदादा राठोड, दुसरें बक्षीस सुभाष आडे,तिसरे बक्षीस भगवान मेंडके यांनी ठेवले होते.पहिले बक्षीस जलधारा,दुसरे बक्षीस गणेशवाडी तांडा,,तिसरे बक्षीस सिरपल्ली ता मुधोळ यांनी पटकाविले. बक्षीस वितरण सोहळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधवराव बिरकलवार, माजी सरपंच रामराव भिसे,दरेसरसमचे चेअरमन निळकंठ राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.
पार्श्वनाथ मंदिर यात्रा महोत्सवात २२व्हॅॉलीबॉल संघाचा सहभाग प्रथम बक्षीस जलधारा संघाला
0
January 05, 2023
