हिमायतनगर प्रतिनिधी/ हिमायतनगर येथील रहिवासी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साईनाथ चिंतावार यांची 36 वर्षे सेवा पुर्ण झाली असुन सेवानिवृत्त झाल्याबद्दल पंचायत समितीच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला आहे.
हिमायतनगर येथील साईनाथ चिंतावार यांनी ग्रामसेवक
किनवट, भोकर, हिमायतनगर 22 वर्षे ग्रामसेवक म्हणून सेवा केली .त्यानंतर विस्तार अधिकारी म्हणून 14 सेवा करून 30 डिसेंबर रोजी त्यांची सेवानिवृत्त झाले आहेत.
पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने विस्तार अधिकारी साईनाथ चिंतावार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आहे. त्यांच्या 36 वर्षाच्या सेवेत अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली विस्तार अधिकारी म्हणून देखील त्यांचे काम वाखाणण्याजोगे होते. भविष्यात असे अधिकारी लाभले पाहिजे असेही गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी व्यक्त केले. ग्रामसेवक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड, विस्तार अधिकारी धर्मेकर, पंचायत विभागाचे दमकोंडवार, विशाल पवार, नितीन मेहतरे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष भोगे,सचिव कदम,शैलेश वडजकर, नारायण काळे, कक्ष अधिकारी गायकवाड, सोनटक्के,स्वप्नील भद्रे, शंकर वानखेडे, आचार्य, सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, गजानन कदम, मारोती वाडेकर,दयाळगिर गिरी,सोपान बोंपीलवार, दत्ता पूपलवाड, यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.
