हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील जनतेच्या आशिर्वादाने आजपर्यंतची संधी...आ. जवळगावकर

हिमायतनगर प्रतिनिधी/   हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील जनतेचे जवळगावकर घराण्यावर अतिशय प्रेम विश्वास असल्यामुळे आजपर्यंत मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही असे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने  बोलतांना व्यक्त केले आहे. 
  हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 26 जानेवारी रोजी जवळगाव येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आ. जवळगावकर यांच्यावर प्रेम करणारे वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळगावकर यांनी हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री. परमेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. व जवळगाव येथे आलेल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या शुभेच्छा स्विकारल्या आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने आभार व्यक्त करतांना जवळगावकर म्हणाले की हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील माझ्या माय बाप जनतेचे माझ्यावर माझ्या परिवारावर खूप  प्रेम उपकार आहेत. जनतेंनी माझ्यावर टाकलेला विश्वासाला जन्मभर तडा जाणार नाही असेही उदगार आ. जवळगावकरांनी व्यक्त केले. यावेळी संचालक शेख रफिकभाई,सुभाष राठोड,संचालक गणेशराव शिंदे, कैलास पाटील माने,सभापती डॉ प्रकाश वानखेडे, सरपंच प्रभावती शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे,परमेश्वर गोपतवाड, योगेश चिलकावार,अ.आखील ,सरपंच गजानन कदम, सुभाष बलपेलवाड,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अ. खालीद अ. मतीन, शहराध्यक्ष संजय माने, नितेश सुर्यवंशी पाटील, अजय सुर्यवंशी, जनार्दन ताडेवाड,सोपान बोंपीलवार,डॉ गफार,गजानन मिराशे, मधुकर घोडगे, सुरेश पळशीकर, मारोती लुम्दे, नाथा चव्हाण, बाळासाहेब चवरे, बाबुराव पवार, प्रविण कोमावार, वडजकर,श्रीदत्त पवार, गणेश देवराये,पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनुर, गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड, वामनराव वानखेडे,संचालक नितेश जैस्वाल,  गजानन सुर्यवंशी,राजेश्वर झरेवाड,दयाळगिर गिरी,प्रदीप संगणवार, यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जवळगावकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.