तेलंगणा राज्यातील केंद्रीय मंत्री इंद्रकरण रेडी यांचा नांदेड दौरा असल्याने सामाजिक कार्यकर्ते शेख रफिकभाई यांच्या निवासस्थानी रेड्डी यांचा ताफा थांबला असता त्यांचा सत्कार करण्यात आले आहे.
नांदेड येथे भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची सभा होणार आहे. त्यानिमित्ताने शनिवारी तेलंगणा राज्यातील केंद्रीय मंत्री इंद्रकरण रेडी यांचा नांदेड दौरा असल्याने केंद्रीय मंत्री इंद्रकिरण रेड्डी व भारत राष्ट्र समितीने पदाधिकारी यांचे हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते शेख रफिकभाई यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने त्यांचा माजी सरपंच शेख चांदभाई, रफिकभाई यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. या प्रसगी तेलंगणा महामंडळाचे अध्यक्ष राज शेखर,आडेली पोचम्मा देवीचे अध्यक्ष आय टी चंदु, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयालक्ष्मी रामकिशन रेडी, सारंगपुर मंडळ चे अध्यक्ष महिपाल रेडी, नारायण रेडी, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्नीनीवास रेडी, गोवर्धन रेडी, माधवराव,भोजारडी, माणिक रेडी,धर्माजी राजेंद्र,अम्माचे चेअरमन मधुकर रेड्डी, बाजार समितीचे उपसभापती दतुराम यांच्या सह तेलंगणातील मान्यवरांची उपस्थिती होती.मंत्री इंद्रकरण रेड्डी यांची आपल्या निवासस्थानी भेट दिल्याने त्यांचा सन्मान केला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शेख रफिकभाई यांनी सांगितले आहे.
