हिमायतनगर प्रतिनिधी/हिमायतनगर तालुक्यातील पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ महादेव मंदिराची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी २ जानेवारीपासून सुरु होत असून ६ जानेवारी रोजी कुस्ती स्पर्धेने यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेत धार्मिक कार्यक्रमाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धासह खो खो स्पर्धा, कबड्डी, शंकरपट, कुस्त्यांची दंगल पाहण्यासारखी होणार आहे. यात्रेत भाविकांसह व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा कमिटीने केले.
२ जानेवारी रोजी सकाळी महाअभिषेकानंतर दुपारी दात्यांच्या सहकार्यातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेनंतर लेझिम स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेचे पहिले बक्षीस मुख्याध्यापिका मंजुषाताई बोंडावार यांच्याकडून २५०१ दुसरे बक्षीस १ हजार रुपये शालेय समितीचे अध्यक्ष सोनबा अनगुलवार तर तिसरे बक्षीस ७०१ रुपये कु. माविका परशुराम विठ्ठलवाड यांच्यातर्फे ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ माजी जि. प. सदस्य सुभाष राठोड यांच्या हस्ते होणार आहे.
पहिले बक्षीस ५००१ रुपये कै. अल्ला नाईक कारभारी यांच्या स्मरणार्थ सुभाषदादा राठोड यांच्यावतीने दुसरे बक्षीस ३००१ रुपये कै. देवलाकाका आडे यांच्या स्मरणार्थ सुभाष आडे यांच्याकडून, तिसरे बक्षीस २००१ रुपये भगवान मेंडके यांच्यातर्फे आहे. ३ जानेवारी रोजी दुपारी ५ ते ९ वीच्या शालेय मुलांच्या खो-खो स्पर्धेचा शुभारंभ पवना येथील चेअरमन रामचंद्र पाटील पवनेकर यांच्या हस्ते होणार असुन पहिले बक्षीस २५०१ रुपये ग्रामसेवक शिवाजी शिरारपलू यांच्यातर्फे, दुसरे बक्षीस २००१ कै उदाजी जाधव काका यांच्या स्मरणार्थ सुभाष जाधव यांच्याकडून, तिसरे बक्षीस ५०१ चेअरमन साहेबराव बिरकलवारतर्फे. मुलांच्या स्पर्धेनंतर इयत्ता ५ वी ते ९ ची पंधरा वयोगटातील मुलींच्या खो-खो स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे पहिले बक्षीस २००१ रुपये कै थावजी काका आडे यांच्या स्मरणार्थ आडे बंधुकडुन, दुसरे बक्षीस १५०१ रुपये ग्रामसेवक विनायक काशीनाथ मेंडके यांच्यावतीने तिसरे बक्षीस ५०१ रुपये सुशिला शाहीर शिरडे यांच्याकडून ३ जानेवारी रोजी दुपारी कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. सोमवार पासून सुरू होणाऱ्या पाचशिव महादेव यात्रेत होणाऱ्या विविध स्पर्धेचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी केले आहे.
